स्तनपान मार्गदर्शन शिबीर

नवी मुंबई ः 1970 मध्ये भारतामध्ये केवळ 10 ते 15 टक्के टक्के स्त्रिया कामासाठी घराबाहेर पडत होत्या, तर 2000 सालानंतर  नंतर हे चित्र कमालीचे बदलले असून आज मुंबई, ठाणे-नवी  मुंबई सारख्या शहरांमध्ये 64 टक्के स्त्रिया कामासाठी बाहेर पडतात. सध्याच्या धावपळीच्या जगातल्या आईला आपल्या बाळाला लागणार्‍या अंगावरील दुधाची निकड किती प्रमाणात पूर्ण करता येते हा प्रश्नच आहे. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे 1 ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो व याच निमित्ताने नेरुळ येथील तेरणा तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे मंगळवार 7 ऑगस्टला संध्याकाळी 5 ते 6 वाजता मोफत स्तनपान मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले असून नवी मुंबईतील नवजात बालकांच्या मातांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे. या शिबीरात तेरणा स्पेशालिटी  हॉस्पिटलच्या एनआयसीयु विभागाच्या प्रमुख बालरोगतज्ञ डॉ. मनीषा शिरोडकर मार्गदर्शन करणार आहेत. या शिबीरात नवजात बालकांची मोफत आरोग्य तपासणी तसेच प्रसूत झालेल्या मातांसाठी आहार तंज्ञाकडून सल्ला दिला जाणार आहे. पहिल्यांदाच आई होणार्‍या स्त्रीला बाळाला पाजणे, हे तंत्र आत्मसात करणे अवघड जाते. बाळ कसं धरावं इथपासून ते अगदी पाजताना बाळाची स्थिती कशी असावी, डोकं कसं धरावं, उजवीकडून पाजावं की डावीकडून, चोवीस तासातून कितीवेळा स्तनपान द्यावं, बाळ दूध घेतय की नाही हे कसं ओळखावं अशा सगळ्या गोष्टीबाबत डॉक्टरांतर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे.