जेएनपीएचा प्रथम सस्टेनबिलिटी रिपोर्ट प्रसिद्ध
- by Aajchi Navi Mumbai
- May 21, 2022
- 412
रेल यार्डचे उद्घाटन ; केंद्रीय मंत्रीश्री सर्बानंद सोनोवाल यांची बंदरास भेट
नवी मुंबई : केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग आणि आयुष मंत्री, सर्बानंद सोनवाल यांनी आज भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणार्या जवाहरलाल नेहरू बंदरास अर्थात जेएनपीए बंदरास भेट दिली. आपल्या भेटी दरम्यान त्यांनी बंदरात नुकत्याच विकसित केलेल्या व डीएफसीशी सुसंगत असलेल्या रेलवे यार्डचे आणि नुकत्याच नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी सोनोवाल यांनी जेएनपीए बंदराचा पहिला सस्टेनबिलिटी रिपोर्ट प्रसिद्ध केला व बंदरातील विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.
जेएनपीए बंदराचे अध्यक्ष संजय सेठी व उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि इतर मान्यवरांचे स्वागत केले. सर्बानंद सोनोवाल यांना केंद्रीय औद्योगिक दलाच्या जवानांनी गार्ड ऑफ ऑनर दिला. या प्रसंगी सर्बानंद सोनोवाल यांनी जेएनपीए बंदराने 33 व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केल्याबद्दल बंदर प्रशासनाचे अभिनंदन केले. ते म्हणाले केंद्रीय बंदरे, जहाजवाहतुक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या प्रधानमंत्री गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन, सागरमाला, मरीटाइम इंडिया विजन (एमआयवी) 2030 सारख्या सर्व उपक्रमांमध्ये जेएनपीए बंदर अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. गेल्या तीन दशकांतील समर्पण आणि योगदान यामुळे जेएनपीए बंदर जागतिक स्तरावर नावरूपास आले आहे.
जेएनपीए बंदरातील विविध प्रकल्पांबाबत केंद्रीय मंत्री महोदयांना माहिती देताना बंदराचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, जेएनपीएमध्ये अनेक पायाभूत सुविधा आणि इतर विकासात्मक प्रकल्प व हरित बंदर उपक्रम सुरू आहेत ज्यामुळे जेएनपी बंदराच्या व्यवसायात वाढ होईल व पर्यायाने देशाच्या आयात-निर्यात व्यापारास चालना मिळेल. आमचे सर्व प्रकल्प मंत्रालयाच्या उपक्रमांशी अनुरूप आहेत ज्यामुळे मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक खर्चात कपात आणि व्यवसाय करणे सुलभ होते. संजय सेठी पुढे म्हणाले, मला हे सांगताना आनंद होत आहे की, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने आमचे प्रयत्न प्रदर्शित करण्यासाठी आम्ही 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आमचा पहिला शाश्वतता (सस्टेनबिलिटी रिपोर्ट) अहवाल प्रसिद्ध केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहोत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai