एपीएमसीत मास्कचा वापर करा
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 08, 2022
- 426
नवी मुंबई : मागील दोन आठवड्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून कोव्हीड प्रतिबंधाच्या दृष्टीने उपाययोजना करून काळजी घेण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजार घटकांनी कोरोनाचा प्रसार अधिक होऊ नये म्हणून मास्कचा वापर करावा असे आवाहन एपीएमसी प्रशासनाने केले आहे.
कोरोना बाधितांच्या सध्याच्या वाढत्या संख्येकडे प्रत्येकाने गांभीर्याने बघण्याची गरज असून नागरिकांनी विशेषत्वाने सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा अनिवार्यपणे वापर करणे, स्वआरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्यामुळे मास्क, सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुणे ही करोना प्रतिबंधाची त्रिसूत्री अंमलात आणावी आणि विहित वेळेत कोव्हीड लसीचा सूरक्षात्मक डोस घेऊन स्वत:ला संरक्षित करून घ्यावे असे आवाहन महापालिकेने ही केले आहे. पहिल्या करोना लाटेत एपीएमसी बाजार समिती ही करोना संसर्गाचा केंद्र बिंदू ठरली होती. नवी मुंबई शहरात तसेच इतर ठिकाणी एपीएमसी मधून संसर्ग फोफावला होता. आता पुन्हा करोना रुग्ण वाढत असून बाजार समितीत कोरोनाचा फैलाव अधिक होऊ नये म्हणून मास्कचा वापर करावा असे परिपत्रक एपीएमसीने काढले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai