14 जुलैला प्लास्टिक विषयक जनजागृतीपर कार्यशाळा
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 12, 2022
- 567
नवी मुंबई ः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जुलै रोजी, सकाळी 11.30 ते दुपारी 01.30 वाजेपर्यत एकल प्लास्टिक वापराबाबत जनजागृतीपर कार्यशाळा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी, सदर कार्यशाळेसाठी नागरिक, दुकानदार, प्लास्टिक निर्माते, शाळा, महाविद्यालय, महिला बचत गट व सामाजिक संस्था तसेच निमशासकीय संस्था यांनी सदर कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्याची सूचना केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना 12 ऑगस्ट 2021 रोजी जारी केली आहे. यानुसार 1 जुलै 2022 पासुन एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्री आणि वापरावर बंदी असेल. सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम-2016 नियम 4 (2) अन्वये यानुसार 1 जुलै 2022 पासून पॉलिस्टीन आणि विस्तारीत पॉलिस्टीरिनसह खालील सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्री आणि वापरावर बंदी असेल.
एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन - डिश, बाऊल, कंटेनर (डबे) (हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजींगकरिता) सदरच्या जाहिर सूचनेव्दारे सर्व उत्पादक, साठवणुकदार, वितरणकर्ता, दुकानदार, ई कॉमर्स कंपन्या, रस्त्यावर विक्री करणारे व्यावसायिक आस्थापना (मॉल, मुख्य बाजार विक्री केंद्र / सिनेमा केंद्र / पर्यटन ठिकाण / शाळा / महाविद्यालय / कार्यालयीन इमारती / रुग्णालय व खाजगी संस्था) तसेच सामान्य नागरिकांना सूचित करण्यात येते की, वरील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अ.क्र. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपरोक्त अधिसूचनेचे उल्लघंन करणार्यांचा माल जप्त करणे, पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारणे, उद्योग व्यावसायिक आस्थापना यांचे कामकाज बंद करणे. तसेच योग्य ती कारवाई केली जाईल. गुन्ह्यांचे स्वरुप पहिला गुन्हा, दुसरा गुन्हा व तिसरा गुन्हा, दंडाची रक्कम व स्वरुप रु.5000, रु.10000 व रु.25000 व 3 महिन्याचा कारावास राहील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai