गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 20, 2022
- 2121
- आदिवासी भागात युगनिर्माते प्रतिष्ठानचा मदतीचा हात
नवी मुंबई ः नवी मुंबईतील युगनिर्माते प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या शैक्षणिक साहित्य वाटप अभियानांतर्गत अनेकांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला अनेक दानशूर व्यक्तींनी प्रतिसाद दिल्यामुळे पालघर सारख्या आदिवासी भागातील मोखाडा येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
आपली आजची येणारी पिढी ही खर्या अर्थाने भारताच भविष्य आहे. आणि आज अनेक ग्रामीण व आदिवासी भागात अर्थकारणामुळे अनेकांना आपल शिक्षण अर्ध्यात थांबवावं लागत आहे. त्यातूनच अनेक ठिकाणी शिकण्यासाठी योग्य साधनांची पूर्ती नाही झाली की ते शिक्षण थांबवावं लागत आहे. अशाच काही मुद्द्यांवर लक्ष देत युगनिर्माते प्रतिष्ठानच्या वतीने ‘स्वराज्य रक्षण्याच्या सेवेसी’ या तत्वाखाली शैक्षणिक साहित्य वाटपाच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न युगनिर्माते प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आला. शैक्षणिक साहित्य वाटप अभियानासाठी युगनिर्माते प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष शंकर वसमाने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारिणी बसवराज नंदी व कोमल शेलार यांच्या नेतृत्वाखाली मदतीसाठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नवी मुंबईतील-महाराष्ट्रातील जनतेने पुढाकार घेतलाच परंतु राजस्थान, गुजरात या राज्यांतून देखील मदतीसाठी अनेक दानशूर व्यक्ती पुढे आले. या सर्व दानशूर व्यक्तीमत्वांमुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या अभियानांतर्गत 17 जुलै, 2022 रोजी पहिला टप्पा हा कळंबोली येथील रत्नमाला कर्णबधिर व मतिमंद केंद्रातील एकूण 20 विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. तर दुसरा टप्पा हा 18 जुलै, 2022 रोजी मोखाडा येथील आदिवासी पाड्यातील स्वामिनगर जि.प. शाळा, कुंडाचापाडा जि.प. शाळा व पिंपळपाडा दापटी जि.प. शाळा येथील एकूण 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. शैक्षणिक साहित्य वाटपाचे स्वरूप पाटी, वह्या, कंपास पेटी, बॅग, चित्रकला वही, रंगीत खडू, इ. स्वरूपाचे होते.
साहित्य वाटप अभियान दरम्यान प्रा. किशोर राऊत सर, प्रा. भोईर सर, बांधिलकी प्रतिष्ठान अध्यक्षा पल्लवी निंबाळकर व स्थानिक साईराज पाटील देखील उपस्थित होते. सदर अभियान यशस्वी पार पाडण्यास उपाध्यक्ष अक्षय चव्हाण, सरचिटणीस सौरभ आहेर, खजिनदार प्रशांत शेलार, सदस्य गौरव शेजवळ, सदस्य तझिन काझी-सुर्वे, सदस्य सागर कदम (गुजरात), समीर कदम (गुजरात), राहुल पांडे (गुजरात) व सचिन पांडे (गुजरात) आदींनी अधिक मेहनत घेतली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai