‘हर घर तिरंगा’ मुळे महिला बचतगटांना आर्थिक सहाय्य
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 23, 2022
- 804
नवी मुंबई - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन साजरा केला जात असताना 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम संपूर्ण देशभरात राबविला जात आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फुर्तीने आपल्या घरी तिरंगा झेंडा फडकवावा असे आवाहन पालिकेने केले आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वजांची गरज लागणार आहे. याकामी महिला संस्था व महिला बचत गट यांचा प्रत्यक्ष सहयोग लाभल्यास महिलांच्या कलागुणांना वाव मिळेल, त्यांना रोजगार उपलब्ध होईल व राष्ट्रीय कार्यात त्यांचे सक्रिय योगदान राहील असे सांगत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी या संधीचा महिलांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन केले.
‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणी करिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध स्तरांतून प्रयत्न करण्यात येत असून या अनुषंगाने विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित महिला बचत गट व संस्था यांच्या कार्यशाळेप्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. यावेळी प्रशासन विभागाचे उप आयुक्त जयदीप पवार यांनी कोणत्याही कामात महिलांचा सहभाग असेल तर ते काम यशस्वी होते असे सांगत ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचा प्रचार व प्रसार करण्यात महिलांचे योगदान मोठे असेल असा विश्वास व्यक्त केला. यावर्षी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असून त्या निमित्त वेगळ्या जल्लोषात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवावयाचा आहे. यामध्ये प्रत्येकाने स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
समाज विकास विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी महिला बचत गटांमार्फत तिरंगी झेंडे बनविणे कामात बचत गटांना महानगरपालिकेचे संपूर्ण सहकार्य असेल असे सांगितले. 12 द 18 इंच आकारात खादी, स्पन, लोकर, सिल्क, पॉलिस्टर कापडाचे झेंडे बनवावयाचे असून कार्यशाळेप्रसंगी उपस्थित 96 बचत गटातील महिलांना या राष्ट्राभिमानी कार्यात सक्रिय योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. याशिवाय ‘हर घर तिरंगा’ उपक्रम घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक महिला संस्था व महिला बचत गट प्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai