आरक्षण सोडतीवर फक्त एकच हरकत
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 03, 2022
- 654
नवी मुंबई : गत शुक्रवारी नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाने ओबीसी आरक्षण जाहीर केले. यावर हरकती व सुचना सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत केवळ एकच हरकत पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या सहाव्या निवडणुकीसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रभाग आरक्षण अंतिम केल्यानंतर मतदार यादीही अंतिम करण्यात आली आहे. न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारल्यानंतर नवी मुंबईत 25.5 टक्के ओबीसी आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार यापूर्वी काढण्यात आलेली आरक्षण सोडतीतील अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण कायम ठेवत 29 जुलै रोजी आरक्षण सोडत काढली. या सोडतीत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी 25 पैकी 13 जागा महिलांसाठी तर खुल्या गटासाठी 84 पैकी 41 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या. शनिवारी या आरक्षणाचे प्रारूप पालिका प्रशासनाने प्रसिध्द करीत यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. यापूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीवर 12 हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. यात वाढ होईल अशी शक्यता होती. मात्र दिलेल्या मुदतीत केवळ एक हरकत प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai