युगनिर्माते प्रतिष्ठानचे रक्तदान शिबिर
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 09, 2022
- 834
नवी मुंबई ः युगनिर्माते प्रतिष्ठानच्या माध्यमातून 7 ऑगस्ट रोजी कोपरखैरणे येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून 49 दात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे रक्तसंकलन माँ साहेब मीनाताई ठाकरे रक्तपेढी, न.मुं.म.पा यांच्या माध्यमातून करण्यात आले.
युगनिर्माते प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यक्ष शंकर वसमाने यांच्या मार्गर्शनाखाली आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अक्षय चव्हाण व खजिनदार प्रशांत शेलार यांच्या नेतृत्वाखाली 07 ऑगस्ट, 2022 रोजी कोपरखैरणे येथील मदर इंडिया मिशन हायस्कूल, से 17 या ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात नवी मुंबई, पनवेल येथील एकूण 49 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिरात गजानन कदम, पोलीस निरीक्षक-कोपखैरणे, मंत्रालय कक्ष अधिकारी संदेश पवार, मदर इंडिया मिशन हायस्कूलचे प्राचार्य संतोष सुतार, प्रा. रजनी सुतार, नवी मुंबई, मुंबई व ठाणे येथील प्रमुख आरएसपी अधिकारी, पोलीस हवालदार भिसे व पाटील, बांधिलकी प्रतिष्ठान अध्यक्षा पल्लवी निंबाळकर, न.मुं.म.पा रक्तपेढी तर्फे डॉ प्रियांका कटके, रक्तसंक्रमण अधिकारी व सरिता खेरवासिया, आदर्श बिरादार - अभाविप नवी मुंबई विद्यार्थी विस्तारक, विशाल कोटपल्लीवार - अभाविप नेरुळ विस्तारक, शुभम शिंदे - अभाविप नवी मुंबई महाविद्यालय प्रमुख, समीर शिंदे, रंजना वराडी, दादा सनस, सुनील डोके, राहुल पाटील, नीरज कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. साई मित्र मंडळ व मोरया मित्र मंडळ यांनी देखील सहभाग नोंदवला.
सदर रक्तदान शिबिर यशस्वी पार पाडण्यास सरचिटणीस सौरभ आहेर, उपसचिव कोमल शेलार, कार्यकारिणी सदस्य गौरव शेजवळ, सुनीता चव्हाण, बसवराज नंदी, शंकर संगपाल, विशाल पिंगळे, तझिन काझी-सुर्वे, प्रथमेश बिरामने, तृप्ती साळवी, मनोज दादा भोईर, श्रीकांत यादव, राज देशमुख आदींनी अधिक मेहनत घेतली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai