नेरुळमध्ये तिरंगा रॅली
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 10, 2022
- 573
नवी मुंबई ः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. घरोघरी तिरंगा फडकविण्यासाठी स्थानिक प्राधिकरणासह लोकप्रतिनिधीं पुढाकार घेतला आहे. नेरुळ शिरवणे येथे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या माध्यमातून 10 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी तिरंगा रॅली, प्रभात फेरी, राष्ट्रध्वजांचे वाटप करणे असे उपक्रम सुरु आहेत. राजकीय पक्षांनीही पुढाकार घेऊन विविध कार्यक्रमांचे नवी मुंबईत आयोजन केले आहे. नेरुळ शिरवणे येथे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या माध्यमातून आज (10 ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आ. मंदाताई म्हात्रे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी सोबत भाजपा महामंत्री डॉ.राजेश पाटील, माजी नगरसेविका माधुरी सुतार, माजी नगरसेवक काशिनाथ पाटील, जयेंद्र सुतार, विजय साळे, प्रभाकर ठाकूर तसेच असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai