जिल्हास्तरीय फुटबॉल व मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 19, 2022
- 735
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजन
उरण ः द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय 14 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेमध्ये एकूण खोपोली, पनवेल आणि उरण मधून एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अंतिम विजेता संघ द्रोणागिरी करंजा इंग्लिश मिडीयम हायस्कूल तर मुळेखंड उरण येथील कोळी किंग हा संघ उप विजेता ठरला.
राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये मुंबई, मुंब्रा, खोपोली, पनवेल आणि उरण येथील 16 संघांनी सहभाग घेतला होता. या सामन्यामध्ये विरेश्वर खोपोली संघाने घऋअ खोपोली संघाला 1 विरुद्ध शुन्य गोलने पराभूत करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विरेश्वर खोपोली संघाने राज्यस्तरीय फुटबॉल प्रथम क्रमांक पटकविला. तसेच जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत 6000 हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. 21 किलोमीटर पुरुष ओपन गटात राज सरोदे प्रथम क्रमांक, द्वितीय स्वराज पाटील, तृतीय राजेश तांबोळी, उत्तेजनार्थ - प्रशांत घरत, सचिन कामत. तर 10 किलोमीटर स्त्री ओपन गटात प्रथम - ऋतुजा सिकवण, द्वितीय -सुजाता माने, तृतीय मयुरी चव्हाण, उत्तेजनार्थ -साक्षी पाटील, ईश्वरी चिर्लेकर तसेच विशेष विद्यार्थीसाठी आयोजित 200 मीटर स्पर्धेत प्रथम सिद्धांत पाटील, द्वितीय दुर्वेश धोत्रे, तृतीय निशांत कोळी, उत्तेजनार्थ -यश रुपनर यांनी बाजी मारली.
पुरस्कार वितरण माजी आमदार मनोहरशेठ भोईर, जेएनपीटीचे विश्वस्त भूषण पाटील, दिनेश पाटील, रवीशेठ पाटील, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव घरत, महिला विभाग प्रमुख वैशाली घरत, सचिव दिलीप तांडेल, आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai