Breaking News
नवी मुंबई ः भाजपने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस यशस्वीपणे राबविल्यानंतर आता भाग-2 हाती घेतला आहे. ऑपरेशन लोटस-2मध्ये काँग्रेसच्या आमदारांना लक्ष करण्यात आले असून येत्या काही दिवसांत त्याचे परिणाम दिसतील अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे.
महाविकास आघाडीचे सरकार फडणवीसांनी ऑपरेशन लोटसव्दारे यशस्वीरित्या पाडून बंडखोर शिवसेना व भाजपचे सरकार राज्यात स्थापन केले. या सरकारविरूध्द सर्वोच्च न्यायालयात याचिका सुरू असून त्याची तमा न बाळगता फडणवीसांनी ऑपरेशन लोटस-2 हाती घेतले आहे. यावेळी काँगे्रसचे 16 आमदार गळाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तूळात असून अद्याप 12 आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव पुढे असुन महाराष्ट्राच्या राजकारणात सक्षम मराठा नेता 2024 च्या लोकसभा निवडणूकीत पुढे करण्याचा भाजपचा डाव आहे. अशोक चव्हाण यांच्यामागे गेले काही महिने आयकर विभाग व ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यातुन सुटका करण्यासाठी चव्हाण भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिंदे गटाचे भवितव्य न्यायालयाच्या हाती असल्याने निर्णय विरूध्द गेल्यास सरकारला धोका उत्पन्न होऊ नये म्हणून फडणवीसांनी महाराष्ट्रात प्लॅन-बी राबविण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसचे किती आमदार गळाला लागतात यावर ऑपरेशन लोटस भाग 2 याचे भवितव्य अवलंबून आहे. दिल्ली, झारखंड येथेही ऑपरेशन लोटस राबविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असून महाराष्ट्रातील संभाव्य घडामोडींकडे देशाचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे