Breaking News
8 महिन्यांत सीसीटीव्ही प्रकल्पाचे काम 3.5 टक्केच पुर्ण
नवी मुंबई ः सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पंरतु फेब्रुवारीमध्ये सुरु झालेले हे 142 रुपयांच्या खर्चाचे काम 5 टक्केही पुर्ण झालेले नाही. 22 नोव्हेंबर रोजी सदर कामाचा कालावधी संपत असल्याने अद्यापपर्यंत एकही कॅमेरा शहरात न लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या कामात कानाडोळा करुन दिरंगाई होत असल्याने ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होवू लागली आहे. त्यामुळे आयुक्त कोणती भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तत्कालीन पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरामध्ये 142 कोटी रुपये खर्च करुन 1454 सीसीटीव्ही कॉमेरे बसवण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. सदर कामाचे कार्यादेश 22 फेब्रुवारी 2022 रोजी देण्यात आले असून काम पुर्ण करण्याचा कालावधी 22 नोव्हेंबर 2022 रोजी संपणार आहे. यामध्ये 119 कोटींचे भांडवली काम असून 13.75 कोटी रुपये संबंधित ठेकेदाराला सीसीटीव्ही यंत्रणेच्या पाच वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात येणार आहे.
आतापर्यंत ठेकेदाराने 175 ठिकणी लावण्यात येणार्या कॅमेरांचे फाऊंडेशनचे काम पुर्ण केले आहे. संपुर्ण शहरात सर्व कॅमेरांना जोडणारी लीज लाईन टाकण्यात येणार असून ठेकेदाराने फक्त ऐरोली विभागातील लीज लाईन परवानगी घेतील आहे. उर्वरित क्षेत्रात ठेकेदार कधी परवानगी घेईल आणि लीज लाईन टाकेल हे गुलदस्त्यात आहे. याबाबत पालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधला असता ठेकेदाराने या कामासाठी लागणारे संपुर्ण कॅमेरे, खांबे, सॉफ्टवेअर आणले आहेत. पालिकेत उभारण्यात येणार्या आयसीसी रुमचे काम पुर्ण झाले असल्याचे सांगितले. एकूण कामाच्या 3.5 टक्केच काम झाले असल्याचे शहर अभियंता विभागाकडून सांगण्यात आले आहे.
गेले तीन वर्ष सीसीटीव्ही कॅमेरांची निविदाप्रक्रिया राबवणार्या शहर अभियंता विभागाने नागरिकांच्या सुरक्षतेच्यादृष्टीने हे काम लवकरात लवकर पुर्ण करणे अपेक्षित असताना कामात दिरंगाई करणार्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे होते. मात्र शहर अभियंता विभागाने ठेकेदारावर दाखवलेल्या औदार्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. ठेकेदाराला परवानग्या मिळण्यात विलंब झाल्याने कामाला उशीर झाला असल्याचे शहर अभियंता विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पावसाळा असल्यामुळे सदर कामास विलंब झाला आहे. संबंधित ठेकेदाराने पुढील चार महिन्यात काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. शहर अभियंता यांच्याशी याबाबत बोलून काम वेळेत पुर्ण नाही केले तर आयुक्तांच्या आदेशानुसार व निविदेतील अटी-शर्तींनुसार संबंधित ठेकेदारावर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. - शिरीष आरदवाड, अति. शहर अभियंता, नमुंमपा
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे