एपीएमसी फळबाजारातील आगीत 25 गाळे खाक
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 18, 2022
- 406
नवी मुंबई : एपीएमसीतील फळ बाजारात गुरुवारी दुपारी भिषण आग लागली. 20 ते 25 दुकाने या आगात खाक झाली असून त्यातील कोट्यावधींच्या मालाचे नुकसान झाले आहे. आगीने रौद्ररुप घेतल्याने ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला सुमारे दोन शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. जागोजागी गाळ्यांलगत असणार्या कागदी पुठ्ठयांमुळे आगीने भिषण रुप घेतले.
फळ मार्केट मधील एन गल्लीत गुरुवारी संध्याकाळी 4.20 च्या सुमारास हि घटना घडली. त्याठिकाणी व्यापारी गाळे व सुरक्षा भिंत यामधील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात कागदी पुठ्ठे व प्लास्टिकचे क्रेट साठवण्यात आले होते. येथील एका गोडाऊनला अचानक आग लागली. या ठिकाणी असणार्या कागदी लगद्याने पेट घेतल्यानंतर ही आग अधिक वाढत जात नजीकच्या लाकडी पेट्या ठेवण्यात आलेल्या दुकानांत पसरली. त्यानंतर एक एक करून इतर दुकाने आगीने आपल्या विळख्यात घेतली. छोट्या आगीचा काही क्षणातच मोठा भडका उडाला. यामुळे त्याठिकाणच्या व्यापारी व कामगारांची पळापळ झाली. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या वाशीसह सर्वच अग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्या दोन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर संध्याकाळी सहाच्या सुमारास आग आटोक्यात आली. कुलींगचे काम पुढील दिड तास सुरु होते.
मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात साठवलेले कागदी पुठ्ठे व इतर साहित्यांमुळे अग्निशमन जवानांना आग वीजवण्यात तारेवरची कसरत करावी लागली. काही मिनिटातच आगीने रौद्रय रूप धारण केल्याने त्याठिकाणी हजारोच्या संख्येत कामगार जमले होते. या आगीत कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. आगी लागली तेव्हा दोघेजण उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या पायाला दुखापती झाली आहे. आगीमध्ये त्याठिकाणची 25 हुन अधिक गाळे जळून खाक झाले आहेत. त्यातील कोट्यवधींच्या फळमालाचे नुकसान झाले आहे. एपीएमसी आवारात यापूर्वी देखील अनेकदा आग लागल्याची घटना घडली आहे.
- गुरुवारी ज्याठिकाणी आग लागली त्याच ठिकाणी यापूर्वी देखील कागदी पुठ्ठयांमुळेच आग लागल्याची घटना घडलेली आहे. त्यानंतर गाळ्यांभवती पुठ्ठयांची साठवणूक करण्याला मनाई केल्यानंतरही जागोजागी त्यांचा साठा केलेला आहे. ही अवैध साठवणुकच आगीला जबाबदार ठरली असल्याची चर्चा परिसरात होती.
- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा, फळ, भाजीपाला, मसाला आणि दाणा बाजार या पाचही बाजार परिसरात एपीएमसी प्रशासनाकडून एकही अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. काही व्यापार्यांनी स्वतंत्रपणे आपापल्या गाळ्यांमध्ये अग्निशामक सुरक्षा बसवल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai