शिधावाटपात ई-पॉस मशीनच्या तांत्रिक अडथळ्याची डोकेदुखी
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 19, 2022
- 587
लाभार्थी व दुकानदारांमध्ये वादावादी; 5जी मशीन देण्याचा विचार
नवी मुंबई : शहरातील शिधावाटप दुकानांमधील ई-पॉस मशीन अनेकवेळा सर्व्हर डाऊन असल्याकारणाने सुरू होत नाहीत. त्यामुळे अन्नधान्य वाटप करण्यात अडचणी येत आहे. धान्य लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच शिधावाटप दुकानदारांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून काही ठिकाणी दुकानदार व लाभार्थी यांच्यामध्ये वादावादी होताना दिसत आहे.
शिधावाटपातील गैरव्यवहाराला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने ई-पॉस मशिनद्वारे धान्यवाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईमध्ये 88 शिधावाटप दुकानांवरून दर महिन्याला शहरातील पिवळ्या व केशरी रंगाच्या सुमारे 51 हजार लाभार्थी शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते. कोरोना महामारीच्या काळात सरकारने लाभार्थ्याना अतिरिक्त धान्य पुरवठा केला. हा अतिरिक्त पुरवठा आज ही सुरू आहे. त्यामुळे अनेक गरजू गरीब कुटुंबावरील उपासमार टळली आहे. तांदूळ, गहू, साखर या सारखे जिन्नस या दुकानांमधून वाटप केले जाते. यासाठी दुकानदारांना सरकारने ई-पॉस मशिनद्वारे धान्य वाटप अनिवार्य केले आहे. परंतु, अनेकवेळा सर्व्हर डाऊन असल्याने लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे दुकानदार व लाभार्थी यांच्यामध्ये तू तू मैं मैं पहावयास मिळते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दुकानदारांना 5जी मशीन देण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, ठाणे जिल्हा शिधावाटप दुकानदार कृती समितीच्यावतीने ई-पॉस मशीन मधील तांत्रिक अडचणीबाबत प्रधान सचिव यांना निवेनाद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच दुकानदार व मापाडी यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणही केली आहे.
काही वेळा सर्व्हरच्या बाबत अडचणी येतात. परंतु, त्या लवकरात लवकर सोडविल्या जातात. धान्य वाटपासाठी अतिरिक्त दिवस वाढवून दिले जातात. लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात येत आहे. - - छाया पालवे, शिधावाटप अधिकारी, वाशी
नवी मुंबई शहरातील एकूण लाभार्थी - 1,50,000
पिवळे व केशरी कार्ड धान्य लाभार्थी - 50,954
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai