दिवाळे गावात रिंगरोडचे भूमीपुजन
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 25, 2022
- 536
नवी मुंबई ः बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने दिवाळे गाव-स्मार्ट व्हिलेज अंतर्गत संपूर्ण दिवाळे गावाभोवती निर्माण होणार्या रिंगरोडचे भूमीपुजन 22 नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. सदर रिंगरोडचे भूमीपुजन नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
दिवाळे गाव-स्मार्ट व्हिलेज अंतर्गत सर्व सेवा, सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. स्मार्ट व्हिलेज दिवाळे गाव नवी मुंबईतील पहिले मॉडेल आपण बनवीत असून त्यामध्ये सुसज्ज जेट्टी, सर्व सुविधांयुक्त 90 गाळ्यांचे मच्छी मार्केट-भाजी मार्केट, 100 वाहनांचे कार शापार्किंग, पलेमिंगो गार्डन उभारण्यात आलेले आहे. तसेच समाजपयोगी बहुउद्देशीय इमारत, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, गजेबो गार्डन, लहान मुलांच्या करमणुकीसाठी खेळणी घर, तरुणांसाठी व्यायाम शाळा, विद्यार्थी-वाचकांसाठी सुसज्ज ग्रंथालय व कंप्युटर प्रशिक्षण केंद्र, विविध कार्यक्रमासाठी मंच अशी अनेक कामे प्रस्तावित असून आता संपूर्ण गावाच्या भोवताली रिंगरोडच्या कामाला सुरुवात झाली असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. दिवाळे गाव नवी मुंबईतील नव्हे तर महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट व्हिलेज असून याची नोंद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. गावातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता संपूर्ण गावाच्या भोवताली रिंगरोड निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. त्या कामाला सुरुवात झाली आहे.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, उपअभियंता अजय पाटील, कनिष्ठ अभियंता रोहन जळे, स्वस्तिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे राजेश वरळीयाक तसेच माजी नगरसेविका भारती कोळी, फगवाले मच्छीमार संस्थांचे अध्यक्ष अनंता बोस, खांदेवाले मच्छीमार संस्थाचे अध्यक्ष रमेश हिंडे, डोलकर मच्छीमार संस्थाचेअध्यक्ष पांडुरंग कोळी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai