प्रकल्पग्रस्त कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी करा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 30, 2022
- 490
आ. मंदा म्हात्रे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई ः शहर वसविण्यासाठी येथील स्थानिकांंनी आपल्या 100 टक्के जमिनी दिल्या. मात्र येथील प्रकल्पग्रस्तांना अद्याप कायमस्वरुपी नोकरी मिळालेली नाही. पालिकेत शेकडोजण वर्षानुवर्ष कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. या कामगारांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याची मागणी आ. मंदा म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे. तसेच लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटणार असून येणार्या अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे आ. म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी येथील स्थानिक भुमीपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या. मात्र त्याबदल्यात योग्य मोबदला व कायमस्वरुपी नोकरी अद्याप मिळाली नसल्याची खंत प्रकल्पग्रस्तांमध्ये आहे. सुरुवातीला सिडको व महापालिकेत काही जणांना नोकरीत सामावून घेण्यात आले मात्र कंत्राटी पद्धतीवर असल्याने त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. गेली 15-20 वर्ष कंत्राटी पद्धतीवर पालिकेत काम करत असलेल्या प्रकल्पग्रस्त कामगारांनी कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याची मागणी आ. मंदा म्हात्रे यांच्याकडे केली होती. 126 कामगारांनी आ. म्हात्रे यांना भेटून निवेदन दिले. त्याची दखल घेत तात्काळ आ. म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन या प्रकल्पग्रस्त कामगारांना कायमस्वरुपी करण्याची मागणी केली आहे. यावेळी आयुक्तांनी कशाप्रकारे या कामगारांना कायमस्वरुपी करण्यात येईल याविषयी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. तसेच कंत्राटी व आस्थापनेवरील कामगारांना न्याय मिळण्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असून हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच येणार्या अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे आ. मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. नवीन आकृतीबंध निर्मितीसाठीही मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
- येथील मुलांनी जायचे कुठे?
नुकतेच बारवी डॅमवरील काही कामगारांना नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्यात आले. परंतु, इतर भागातून प्रकल्पग्रस्त कामगार नवी मुंबईत येत असतील तर येथील मुलांनी जायचे कुठे? त्यांना कधी कायमस्वरुपी करणार असा प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केला. त्यामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे. तसेच सिडकोमधील कंत्राटी कामगारांच्या कायमस्वरुपी नोकरीसाठीही लवकरच सिडको व्यवस्थापकीय संचालकांना भेटणार असल्याचे आ. म्हात्रे यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कंत्राटी बेस वर काम करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी आमदार मंदा म्हात्रें यांच्याकडे प्रत्यक्ष निवेदनाद्वारे कायमस्वरूपी करण्याची मागणी केली
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai