मराठी भाषा विभागाचे नवीन घोषवाक्य
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 03, 2022
- 907
‘भाषा जनाची भाषा मनाची’
मुंबई : मराठी भाषा विभागाने आपल्या विविध कामकाज आणि उपक्रमासाठी तसेच मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी आज आपले घोषवाक्य आणि बोधचिन्ह जाहीर केले आहेत. ‘भाषा जनाची भाषा मनाची’असे हे घोषवाक्य असणारा असून बोधचिन्हही आज जाहीर केले.
शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांनी मराठी भाषा विभागाच्या बोधचिन्ह आणि बोधवाक्य यासाठी आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध संस्था आणि चित्रकारांकडून हे बोधचिन्ह तयार केले आहे. त्यातील एका बोधचीन्हाची अंतिम निवड विभागाने करून ते विभागाने जाहीर केले आहे. तर बोधवाक्यासाठीही राज्यभरातील कवी साहित्यिक विचारवंतांकडून बोधवाक्य मागविण्यात आले होते. त्यातील भाषा जनाची भाषा मनाची हे बोधवाक्य अंतिम करण्यात आले. मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनाच्या दृष्टीने उपक्रमांची माहिती विविध जाहीरातींद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्यात येते.
- कामकाजात होणारा वापर
मराठी भाषा विकास तिच्या प्रसार आणि प्रसारा संदर्भातील सर्व उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये नवीन बोधचिन्ह आणि बोधवाक्याचा प्रभावीपणे वापर केला जाणार आहे. तसेच विभागाने प्रायोजकत्व स्वीकारलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये आणि विभागाच्या जाहीरातींमध्ये या बोधचिन्ह आणि बोधवाक्याचा वापर लगेचच केला जाणार
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai