मनोरंजक पपेट शोव्दारे दिव्यांगत्वाबाबत प्रबोधन
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 10, 2023
- 499
नवी मुंबई ः ईटीसी केंद्रामार्फत दिव्यांग कल्याणकारी विविध योजना राबविण्याप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांचा दिव्यांगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही प्रयत्न केला जात आहे. याकरिता विविध माध्यमांचा उपयोग केला जात असून मुलांमधील मनोरंजक खेळाची आवड लक्षात घेऊन पपेट शो सारख्या उपक्रमातून दिव्यांगाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून संपूर्ण डिसेंबर महिन्यात करण्यात आला.
या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या व खाजगी शाळाशाळांमध्ये जाऊन पपेट शोव्दारे दिव्यांगत्वाबाबत प्रबोधन करण्यात आले. याव्दारे मुलांना विविध प्रकारच्या दिव्यांगत्वाची माहिती मिळावी तसेच मुलांच्या मनामध्ये आपल्या दिव्यांग मित्रांबाबत तसेच समाजातील इतर दिव्यांगांबाबत सहकार्याची भावना निर्माण व्हावी हा उद्देश या उपक्रमाला सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिलेला उत्स्फुर्त प्रतिसाद बघता सफल झाली असल्याचे चित्र बघायला मिळाले. याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी दिव्यांगत्वाविषयी जनजागृतीपर पथनाट्यांचे महिनाभर आयोजन करण्यात आले होते. याशिवाय ईटीसी केंद्रामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता आर्ट अँड क्राफ्ट कार्याशाळांचे आयोजन करण्यात आले. 3 टप्प्यांमध्ये स्टेन्सील्स प्रिटं ऑन हँकरचीफ, मंडाला आर्ट, पेबल आर्ट अशा तीन कार्यशाळा आयोजित करून दिव्यांगांना या आधुनिक कलेचे प्रशिक्षण देण्यात आले.
जागतिक दिव्यांग दिनी आयोजित वॉकेथॉन उपक्रमांत दिव्यांग मुलांसह त्यांचे पालक, दिव्यांग कल्याणकारी कार्य करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी, दिव्यांगांविषयी सेवाभावी काम करणाऱ्या व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai