20 व्यावसायिकांकडून 1 लाख दंड वसूली
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 31, 2023
- 556
नवी मुंबई ः पर्यावरप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी प्लास्टिकचा धोका ओळखून प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळावा तसेच पर्यायी कापडी व कागदी पिशव्यांचा प्राधान्याने वापर करावा याविषयी पालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. यासोबतच प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या वापरास खीळ बसावी यादृष्टीने धडक कारवाया करण्यात येत आहेत. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या 20 व्यावसायिकांकडून 1 लाख रुपयांची दंड वसूली करण्यात आली.
प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक कारवाई परिमंडळ 2 चे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी महेंद्र सप्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सलग 2 दिवस केली असून पहिल्या दिवशी रु.40 हजार व दुसऱ्या दिवशी रु.60 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. तसेच त्याच्याकडील प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. यामध्ये सेक्टर 2 ऐरोली येथील हॉटेल वृषाली, फिरोज चायनीज सेंटर, साई स्नॅक्स, लोकल कट्टा, महालक्ष्मी भोजनालय, पतंग हॉटेल, बेहप्पा मोमोज, सावित्रीदेवी निषाद या व्यावसायिकांकडून सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्याने प्रत्येकी रु.5 हजार प्रमाणे एकूण रु.40 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे हिच धडक कारवाईची मोहीम दुसऱ्या दिवशीही प्रभावीपणे राबवित सेक्टर 20, ऐरोली गांव, यादवनगर तसेच प्र.क्र. 11, 12, 14, 06 या परिसरात धडक कारवाई करत 45 दुकानांची झडती घेण्यात आली. यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळलेल्या स्टोअर्स, किराणा भांडार, चिकन शॉप, डेअरी, जनरल स्टोअर्स, फळ विक्रेता अशा 12 व्यावसायिकांकडून प्रत्येकी रु.5 हजार प्रमाणे एकूण रक्कम रु.60 हजार इतका दंड वसूल कऱण्यात आलेला आहे व प्लास्टिकचा साठाही जप्त करण्यात आलेला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai