हिवाळ्यात केसांची निगा
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 18, 2023
- 781
हिवाळ्यातील कोरडी हवा आणि कमी झालेले आर्द्रतेचे प्रमाण यामुळे केसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आणि टाळूवरील त्वचा कोरडी होऊन खपली येते. हिवाळ्यातील केसांसंबंधी समस्या टाळण्यासाठी टिप्स
1. तेल लावा : हिवाळ्यात टाळूवरील त्वचा कोरडी होऊन खाज सुटते आणि त्यामुळे कोंडा होण्याची शक्यता वाढते. आठवड्यातून एक किंवा दोनदा केसांना आणि टाळूवर थोडेसे कोमट तेल मसाज केल्याने केसांच्या मुळांचे पोषण होण्यास मदत होईल. हिवाळ्यात तेल लावल्याने केसांच्या मुळांना रक्तपुरवठा होण्यास मदत होते तसेच केस आणि टाळू मॉइश्चराईज होतात. नारळ, रोझमेरी, बदाम, तीळ, ऑलिव्ह, जोजोबा इत्यादी तेलांचा वापर करुन पाहू शकता.
2. केस जास्त धुवू नका : नैसर्गिक तेल स्रावामुळे हिवाळ्यात टाळू खूप तेलकट बनते. जास्त वेळा केस धुण्याचा मोह टाळावा. आठवड्यातून जास्तीत जास्त दोनदा केस धुणे योग्य राहिल. तुमचा शॅम्पू आणि कंडिशनर सल्फेट आणि पॅराबेन फ्री असावे.
3. कंडिशनिंग करा : शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर कधीही वगळू नका. केसांना कंडिशन करण्यासाठी फक्त पाच मिनिटे लागतात. असे कंडिशनर शोधा ज्यात नारळापासून तयार केलेली उत्पादने आहेत जसे की सेटाईल अल्कोहोल जे प्रत्येक थराचे संरक्षण करतात आणि केसांना मॉइश्चराईज करतात. अशाप्रकारे तुम्ही तुमचे केस कोरडे होण्यापासून वाचवू शकता आणि केस तुटणे देखील टाळू शकता. कंडिशनर केसांच्या मुळांना न लावता खालच्या दिशेने केसांच्या टोकापर्यंत लावा आणि काही मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
4. ओल केस घेऊन बाहेर पडू नका : हिवाळ्यात केस सुकवणे हे एक मोठे काम आहे. परंतु ओल्या केसांनी हवेत बाहेर पडणे अधिक नुकसानकारक ठरेल. हिवाळ्यातील हवेत ओले केस जास्त प्रमाणात तुटतात. केसांना नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या परंतु टॉवेलने जोरात घासू नका.
5. ब्लो ड्राय वापरु नका : थंडीच्या दिवसात केस सर्वात कमकुवत होतात आणि अशा कमकुवत केसांवर उष्णतेचा वापर केल्याने केस तूटू शकतात. हिवाळ्यात केसांना ब्लो ड्रायरचा वापर करु नका.
6. केस खालच्या दिशेने विंचरा : के कोरडी हवा केसांना शुष्क बनवतात. त्यामुळे केसांचे नुकसान होते आणि केस तुटण्याचे प्रमाण वाढते. म्हणून, लिव्ह इन कंडिशनर लावा, रेशमी स्कार्फ वापरा. टाळूवरील ताण कमी करण्यासाठी केस खालच्या दिशेने विंचरा.
7. योग्य आहाराचे सेवन करा : केस निरोगी ठेवण्यासाठी तुमचा आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. पुरेसे पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवा. गाजर, अंडी, भोपळा आणि बेरीज यासारखे प्रथिने आणि जीवनसत्त्वांचा समावेश असलेल्या अन्नाचे सेवन करा. ओमेगा 3 समृद्ध अन्न जसे की पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि फॅटी ॲसिड तुमच्या केसांच्या आरोग्यास चालना देतात. बदाम, काजू, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया केस तुटण्याची शक्यता कमी करतात आणि केसांची चमक वाढवतात.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai