रा. बौद्धिक सशक्तिकरण संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 23, 2023
- 560
नवी मुंबई : येथील राष्ट्रीय बौद्धिक सशक्तिकरण संस्था, सिकंदराबाद संस्थेचा 39 वा वर्धापनदिन संस्थेच्या खारघर नवी मुंबई येथील भवनात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
22 फेब्रुवारी 2023 तारखेला संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम क्षेत्रीय केंद्रात पार पडला. संस्था प्रमुख बी.वी. रामकुमार व संस्था प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या क्रीडा उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ रवी प्रकाश सिंह, मुख्य पाहुणे लीना गरड, समाजसेविका आणि अध्यक्ष खारघर कॉलनी फोरम सन्मानिय पाहुणे डॉ कविता पोळ संचालक आणि प्राध्यापक वाय एम टी डेंटल कॉलेज आणि ट्रस्टी डॉ.जी.डी. पोळ फाउंडेशन आणि शिरीष पुजारी संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त स्वामी ब्रह्मानंद स्पेशल स्कूल उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते वार्षिक क्रीडासंमेलनाचे पारितोषिक वितरण करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांचे तसेच प्रशिक्षणार्थी विजेत्यांचे कौतुक करण्यात आले. पाहुण्यांच्या उपस्थितीत दिव्यांग विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, पालक आणि कर्मचारी वर्ग यांनी नृत्य, गायन, वेशभूषा आणि नाटक सादरीकरणातून आपले कलागुण दाखवले. पाहुण्यांनी या सर्वांच्या सादरीकरणाला भरभरून दाद दिली. हा संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन शिल्पी सोनोने आणि अनुशा संपथ यांनी संपूर्ण कर्मचारी वर्गाच्या सहयोगाने केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai