Breaking News
वाशीत मोकळ्या परिसरामध्ये डेब्रिज व बांधकाम साहित्यांचा ढीग : पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल क्रमांक गाठणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेचे सूचना वजा इशारा फलक कचरा व डेब्रिजने व्यापले आहेत. पालिका अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने फक्त स्वच्छता अभियानादरम्यानच पालिका जागरूक असते काय? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
शहरात कुठेही कचरा किंवा डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पालिकेकडून फलक लावून दिला जातो. परंतु, वाशीतील हा परिसर पाहून डेब्रिजमाफीयांना व कचरा करणाऱ्यांना अधिकाऱ्यांचे अभय मिळते आहे का? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. वाशी सेक्टर 15 येथील बी 2 टाईप रहिवासी परिसरामध्ये महावितरणच्या डीपीला लागून मोकळी जागा आहे. ही मोकळी जागा वाहनतळ तर बनली आहेच, परंतु त्याबरोबर ती कचरा आणि डेब्रिजनेही व्यापली आहे. नागरिकांना सूचना वजा कायदेशीर कारवाईचा इशारा देणारा फलक इथे बसवला असला तरी हा फलकच डेब्रीजच्या विळख्यात अडकला आहे. परिसरामध्ये बांधकामे सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डेब्रिज इथे टाकले जात आहे. सार्वजनिक कचराकुंडीच्या अभावाने काही नागरिक याच ठिकाणी घरातील टाकाऊ वस्तू, बॅग, मटका, कपडे, कागदी बॉक्स, मोडके प्लायवूड तसेच पत्रे आणून टाकत आहेत. ह्या सर्व प्रकारामुळे या परिसराला अत्यंत बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. काही सुज्ञ नागरिकांकडून मात्र हा परिसर मोकळा व स्वच्छ करण्याची मागणी केली जात आहे.
वारंवार येथील डेब्रिजबाबत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. अनेक वेळा स्वखर्चाने ही जागा स्वच्छ करण्यात आली. महापालिकेने या ठिकाणी नियमित स्वच्छ्ता करणे गरजेचे असून याबाबत जनजागृती करावी.- अंजली अजय वाळुंज, माजी नगरसेविका
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे