ई-कचऱ्यापासून बनवला नवी मुंबईचा नकाशा
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 16, 2023
- 438
नवी मुंबई ः पुर्वेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि पश्चिमेकडील खाडीकिनारा यामध्ये वसलेले नवी मुंबई शहर सुनियोजित बांधणीचे आधुनिक शहर म्हणून नावाजले जाते. 109.59 चौ.कि.मी. क्षेत्रात विस्तारलेली नवी मुंबई दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी, नेरुळ, बेलापूर अशा 8 विभागांत सामावलेली आहे. अशा पालिका क्षेत्राचे विहंगम दर्शन घडविणारा नकाशा नुकताच पालिका आयुक्तांच्या दालनात प्रदर्शित करण्यात आला आहे. या नकाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्मिती टाकाऊ संगणकीय साहित्यापासून करण्यात आलेली आहे.
यापूर्वी महापालिका मुख्यालयात घनकचरा व्यवस्थापन विभागात लावण्यात आलेल्या संगणकीय टाकाऊ साहित्यापासून तयार केलेल्या मदर इंडिया बोर्ड स्वरुपातील भारताच्या नकाशा ची विक्रमी नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये राष्ट्रीय पातळीवर झालेली असून अशाच प्रकारचा नकाशा कोपरखैरणे येथील स्वच्छता पार्कमध्ये लावण्यात आलेला आहे. हे नकाशे संगणकातील अथवा लॅपटॉपमधील विविध टाकाऊ साहित्यापासून बनविण्यात आलेले आहेत. याच धर्तीवर नवी मुंबई पालिका क्षेत्राचा 5 फूट उंचीचा नादुरूस्त संगणक व लॅपटॉपधील मदरबोर्ड व इतर साहित्यापासून हा नकाशा बनविला आहे.
- 23 निरुपयोगी वस्तूंचा समावेश
23 निरुपयोगी लॅपटॉप, संगणकातील सर्कीट बोर्ड, कन्डेन्सर बॅटरी व वायर्स यांचा वापर करून बनविलेला हा नवी मुंबईचा नकाशा त्याच्या आगळ्या वेगळ्या स्वरुपामुळे पटकन लक्ष वेधून घेतो. नवी मुंबईतील वेस्ट टू बेस्ट आर्टीस्ट किशोर बिश्वास यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मदर इंडिया बोर्ड नकाशासारखाच हा नवी मुंबईचा नकाशाही टाकाऊ वस्तूंपासून बनविलेला असून त्यामुळे आयुक्त दालनाची शोभा वाढली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai