Breaking News
आईस्क्रीम कुणाला आवडत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आईस्क्रीमचे चाहते आहेत. आईस्क्रीम हा गोठवलेल्या दुधापासून बनविलेला एक थंडगार खाद्यपदार्थ आहे. विविध रंग, सुगंध व फळे वापरून विशेष आईस्क्रीम बनवले जाते.
वाशी सेक्टर 14 मधील मर्चंट जिमखान्यासमोरील गुप्ता आईस्क्रीम सेंटर हे ही तिथे मिळणाऱ्या मलाई मावा कुल्फीसाठी लोकप्रिय आहे. सुमारे 27 वर्षांपासून हे गुप्ता आईस्क्रीम सेंटर सुरू आहे. सकाळी 9 ते रात्री 11.30 पर्यंत इथे ग्राहकांची रीघ असते. मनोज गुप्ता यांनी सुरू केलेल्या या सेंटरवर तीन ते चार कारागीर काम करतात. इथल्या मलाई मावा कुल्फीची भन्नाट चव आईस्क्रीम लव्हर्ससाठी पर्वणी ठरते. दूध, साखर, विलायची, सुकामेवा इत्यादींचा वापर यासाठी केला जातो. आईस्क्रीम बनविण्यासाठी ठाणे येथील तबेल्यातून म्हशीचे दूध मागविले जाते. ही मलाई मावा कुल्फी बनविण्यासाठी सुमारे एक तासांचा कालावधी लागतो. या ठिकाणी कुल्फी व्यतिरिक्त आईस्क्रीमचे विविध प्रकार मिळतात. कुल्फी, फालुदा, आईस्क्रीम स्लाईस, आईस्क्रीम फालुदा स्लाइस, स्कूप तसेच विविध लोकप्रिय ब्रँडचे आईस्क्रीम कोन, चोकोबारही इथे मिळतात. गुप्ता आईस्क्रीम सेंटर सोशल मीडियावर नसले तरी शहरात मात्र लोकप्रिय आहे. आईस्क्रीमची अधिकची मागणी असल्यास मोफत घरपोच सेवा दिली जाते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे