Breaking News
चंद्राच्या प्रकाशाचे अनेक फायदे आहेत यामुळे शरद पौर्णिमेच्या या रात्री खीर चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते आणि नंतर ती खीर सकाळी खाल्ली जाते. आज आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खीर कशी तयार करायची त्याची झटपट रेसीपी काय आहे हे जाणून घेणार आहोत.
साहित्य
अशी तयार करा खीर
खीर तयार करण्यासाठी सर्वात आधी तांदूळ धुवून स्वच्छ करा आणि 20-25 मिनिटे तसंच भिजत ठेवा. दूध पातेल्यामध्ये घेऊन ते मध्यम गॅसवर उकळायला ठेवा. आता कढईत तूप गरम करून त्यात तांदूळ टाकून चांगले परतून घ्या. उकळत्या दुधात भाजलेले तांदूळ टाका आणि 20 ते 25 मिनिटे दोन्ही एकसारखे होईपर्यंत शिजवा. आता यामध्ये काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करुन टाका. खीर चांगली शिजल्यानंतर गॅस बंद करून त्यात साखर घालून मिक्स करा. यानंतर पुन्हा काजूचे काप, गुलाबपाणी, वेलची पावडर आणि केशर घालून खीर व्यवस्थित मिक्स करा. खीर एका भांड्यात काढून गुलाबाच्या पाकळ्यांनी ती सजवा. आता खीर व्यवस्थित पातळ कापडाने झाकून चंद्राच्या प्रकाशात ठेवा. सकाळी या खीरीचे सेवन करा.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai