पाणजे पाणथळ क्षेत्र सेझ विकासासाठी चिन्हांकित
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 30, 2023
- 193
नवी मुंबई ः सिडकोद्वारे नवी मुंबई सेझ मार्फत 289 हेक्टर आकारमानाच्या पाणजे पाणथळ क्षेत्राचे नवी मुंबई सेझ विकासासाठी चिन्हांकन करण्यात आले आहे, अशी स्पष्टोवती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. नॅटकनेवट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी पाणथळ समितीकडे केलेल्या तक्रारीवरुन जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्वेक्षण टीमने पाणजे क्षेत्राची पाहणी करुन दिलेल्या अहवालामध्ये सदर बाबीची पुष्टी केली. पर्यावरणवाद्यांनी केंद्र शासन, राज्य शासन आणि उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या पाणथळ समितीकडे या सीआरझेड-1 संपदेचे संरक्षण करण्याचे निवेदन दिले आहे.
दरम्यान, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील सदर क्षेत्रावर नवी मुंबई सेझने आयटी हब उभारण्याचे नियोजन केले आहे. पाणजे पाणथळ क्षेत्राला सेक्टर-16 ते 28 च्या स्वरुपात सिडकोद्वारे विकसित केल्या जाणाऱ्या द्रोणागिरी विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहे, असे पाहणी अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. पाणथळ समितीच्या 39व्या बैठकीत उल्लेख केल्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार येथे अजूनपर्यंत आयटी हबसाठी कोणत्याही प्रकारचे काम केल्याचे किंवा खारफुटीच्या ऱ्हासाचे कोणतेही चिन्ह दिसून आलेले नाही. तर जिल्हाधिकाऱ्यांनी नमुद केल्यानुसार पाणथळ क्षेत्र पाणथळ नियम 2010 च्या अंतर्गत सूचित केले गेलेले नाही. पाणथळ समितीने सिडको आणि कांदळवन कक्षाला समितीच्या पुढील बैठकीआधी त्यांचे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालावर मत व्यक्त करताना बी. एन. कुमार म्हणाले, यामुळे सिडको आता उरण येथील महत्वाच्या इतर आंतरभरती पाणथळ क्षेत्रांसोबत पाणजे पाणथळ क्षेत्र देखील नष्ट करण्याचा चंग बांधत असल्याबाबत आम्ही व्यक्त केलेली भिती खरी ठरत असल्याचे म्हणाले. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (एमओइएफसीसी) तयार केलेल्या राष्ट्रीय पाणथळ संपदा ॲटलास प्रमाणे पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण करणे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील जल संरक्षण आणि पूर नियंत्रणासाठी 2.25 हेक्टरपेक्षा जास्त पाणथळ क्षेत्रांच्या संरक्षणाचे निर्देश दिले असल्याचा उल्लेख नॅटकनेवट फाऊंडेशनने यानिमित्ताने केला आहे.
दरम्यान, ॲटलासमधल्या आकृतीला दाखवत कंझर्व्हेशन ॲक्शन ट्रस्टच्या (कॅट) देबी गोएंका यांनी पाणजे पाणथळ क्षेत्राला 2017-18च्या वेटलँड ॲटलासमध्ये पाणथळ क्षेत्र म्हणून चिन्हांकित केले गेल्याची माहिती ट्वीिटद्वारे दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai