Breaking News
19 जुनपर्यंत खुलासा करण्याचे लेखापरिक्षकांचे आदेश
नवी मुंबई ः सहनिंबधक सहकारी संस्था (सिडको) यांच्या आदेशावरुन विशेष लेखापरिक्षक वर्ग-2, ठाणे यांनी नेरुळ येथील गणेश हौसिंग सोसायटीचे विशेष लेखापरिक्षण करुन आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात त्यांनी संचालक मंडळावर बोगस कागदपत्रे तयार करणे, गैरपद्धतीने मालमत्ता हस्तांतरण करणे, मान्यता न घेताच मोठा खर्च करणे, शासनाचे मुद्रांक शुल्क बुडवणे, चुकीचे व खोटे हिशोब नोंदवणे यासारखे गंभीर आरोप केले आहेत. संबंधित लेखापरिक्षकाने या सोसायटीच्या संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागवल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
संस्थेच्या सभासदांच्या तक्रारीवरुन सहनिबंधक सहकारी संस्था(सिडको) नवी मुंबई यांनी गणेश को.ऑप हौ. सोसायटी लि. चे सुरुवातीपासून ते सन 2016 पर्यंतचे विशेष लेखापरिक्षण करण्याचे आदेश दिले होते. लेखापरिक्षक विजय पाखले यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 81(3) अन्वये लेखापरिक्षण करुन आपला अहवाल जिल्हा उपनिंबधक सहकारी संस्था यांना सादर केला आहे. या अहवालात त्यांनी अनेक गंभीर ताशेरे संस्थेचे अध्यक्ष अशोक गावडे व पदाधिकारी यांच्यावर ओढले आहेत.
एपीएमसीत व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना नवी मुंबईत घरे उपलब्ध व्हावी म्हणून त्यांच्या गृहनिर्माण संस्थांना अनेक भुखंड सिडकोने शासनमान्यतेने वितरीत केले होते. 6 फेब्रुवारी 1993 च्या आदेशाने गणेश सहकारी गृहरचना संस्था मर्यादित सोबत अन्य पाच सहकारी संस्थांना सदर भूखंड वाटपाचे पत्र दिले होते. या आदेशावरुन 17 फेब्रुवारी 1993 रोजी या संस्थेची नोंदणी ठाणे येथे करण्यात आली. या संस्थेत सभासद होणाऱ्या व्यक्तींसंदर्भात ‘फ्रुट अँड व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशन' यांचेकडून जो फळे आणि भाजीपाला व्यापर करतो व नवी मुंबईत स्थलांतरीत होणार आहे याबाबतचे प्रमाणपत्र घेण्याची अट टाकण्यात आली होती. परंतु, या अटीचे उल्लंघन मुख्य प्रवर्तक अशोक गावडे यांनी करुन सभासद होण्यासाठी त्यांनी नोंदणी केलेल्या दादर भाजीपाला व्यापारी मित्रमंडळाचे शिफारस पत्र आणणे बंधनकारक केल्याचा ठपका या अहवालात ठेवला आहे. दोन्हीही संस्थांचे मुख्य प्रवर्तक अशोक गावडे असून त्यांनी नोंदणी प्रस्तावा व्यतिरिक्त कोणतीही कागदपत्रे सादर केले नसल्याचे नमुद केले आहे. या संस्थेचे सभासद नसतानाही 21 व्यक्तींना अशोक गावडे यांनी गणेश गृहनिर्माण संस्थेचे सदस्यत्व दिल्याचा आक्षेप नोंदविला आहे. याउलट शिफारसपत्र देणेकामी पैशाची मागणी पुर्ण न केल्याने शिफारस पत्र न दिल्याचा गंभीर आरोप सदनिका क्र. बी-3/ 32ः चे मालक मंगल अजिंक्य घरत यांनी केला आहे. संस्था नोंदणीकृत नसतानाही संस्थेच्या लेटरहेडवर अध्यक्ष या नात्याने विकासक मयुरेश डेव्हलपर्स यांना 372 व्यक्तींना सदनिका वाटप करणेबाबत बनावट कागदपत्रे तयार करुन शिफारस केल्याने शासनाची फसवणुक व विश्वासघात झाल्याचा गंभीर आक्षेप नोंदवला आहे.
संस्थेतील अनेक सभासदांनी उपविधी क्र.17(अ) च्या तरतूदींचे उल्लंघन करुन एकापेक्षा जास्त सदनिका स्वतःच्या व आपल्या कुटुंबाच्या नावाने खरेदी केल्याचा गंभीर आरोप नोंदवला आहे. ते खालील तक्त्यावरुन दिसून येते. वरील सदस्यांच्या हस्तांतरणास मंजूरी देताना पोटनियमातील नियमांची पुर्तता केली का? व नसल्यास काय कारवाई केली? याचा खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अ.क्र. सदनिका क्र. सभासदाचे नाव
1. ए-1/4.1, 7.1 श्री. अशोक गावडे
2. ए-1/7.2 सौ. निर्मला अशोक गावडे
3. ब-4/7.1,7.2 श्री. प्रविण गावडे
4. ब-4/6.1, अे-2/1.2 पुजा प्रविण गावडे
5. सी-1/4.2 श्री.केशव वाघुले
6. सी-1/2.2 श्री.रविंद्र केशव वाघुले
7. ब-5/1.3 श्री.जी.बी.हाडवळे
8. ब-5/1.4 श्री.एल.जी.हाडवळे
9. ब-8/6.1 श्री.संजय चव्हाण
10. ब-8/6.2 सौ. संगिता संजय चव्हाण
11. अ-2/4.4,ब-7/5.1 श्री.गिरीश भोर
12. अ-4/4.2,क-4/2.3 श्री.शाम सोनू भोर
13. अ-4/5.1 सौ.जयश्री शाम भोर
14. ब-4/4.3 व 4.4 श्री.सुरेश तळेकर
15. ब-7/4.1,ड-1/3.1 श्री.रंगनाथ घुले
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे