वाशीत रंगणार मंगळागौरीचा खेळ
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 05, 2023
- 817
श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने आयोजन
नवी मुंबई ः श्रावण महिना म्हणजे सणावारांची लगबग सुरु होते. यामध्ये मंगळागौरीचेही विशेष महत्त्व असते. श्रावणातल्या मंगळवारी नवविवाहितेने मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे. आजही ही प्रथा तितक्याच भावुकतेने केली जाते. श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदा ही 12 ऑगस्ट 2023 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे खास महिलांकरिता मंगळागौरीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा व आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मंगळागौर पूजन हळूहळू कालबाह्य होत चालले आहे. तरीदेखील काही संस्थांनी मंगळागौर साजरी करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. मंगळागौरीच्या खेळातून महिलांच्या मनाला आनंद तर मिळतच असतो मात्र शरीराला व्यायामही होतो. आता महिला नोकरी करणाऱ्या असल्यामुळे मंगळागौर जागविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु हा पारंपरिक खेळ टिकला पाहिजे यासाठी दरवर्षी श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही 12 ऑगस्ट 2023 रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे ठीक सकाळी 9:00 ते दुपारी 02:00 वाजेपर्यंत खास महिलांकरिता मंगळागौरीचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात विविध खेळ खेळण्याचा अनादी काळापासून चालत आलेला प्रघात दिसून येणार आहे यामध्ये मंगळागौरीची पारंपारिक नृत्य, गाणी म्हणत खेळ खेळून मनमुराद आनंद लुटता येणार आहे. तसेच यामध्ये लाट्या बाई लाट्या, सारंगी लाट्या, फू बाई फू, अठूडं केलं गठूडं केलं अशी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची संधी महिलांना मिळणार आहे. तसेच या मंगळागौरीच्या कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य, पारंपारिक गायन व विविध प्रकारच्या कला दाखविणाऱ्या महिलांना प्रथम परितोषिक रु. 5001, द्वितीय पारितोषिक 3001, तृतीय परितोषिक रु. 2001 तसेच उत्तेजनार्थ यांना बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून नशीबवान महिला विजेत्याला पैठणी, नथ अशा विविध प्रकारची बक्षीस देऊन सन्मानित केली जाणार आहे. तसेच बक्षीस वितरण समारंभ हे त्याच दिवशी होणार आहे.
सदर मंगलागौरी कार्यक्रम हा फक्त 151 बेलापूर विधानसभा महिलांसाठी मर्यादित असून प्रवेश हे विनामुल्य आहे. नाव नोंदणी तसेच महिला बचत गटांना स्टॉल (विनामूल्य) लावायचे असल्यास त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा. नोंदणीची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे.
- आरती राऊल -9967648091,
- हेमंत कोळी 9167302827,
- आदित्य नेवरेकर - 7304339333
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai