Breaking News
बाप्पाच्या गजराने दुमदुमला परिसर : गणेशभक्तांची मांदियाळी
नवी मुंबई : वाशी, सेक्टर 15 मधील ए टाईपचा राजा गणेशोत्सव मंडळाच्यावतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मंगळवार दि. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी श्रीगणेश पाटपूजन सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते.
सुमारे एक दशकाहून अधिक काळ म्हणजे 2012 साली स्थापना झालेल्या ए टाईपचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहात व जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या मंडळाच्या पाच दिवसांचा गणपतीचा आगमन सोहळा आणि विसर्जन सोहळा हा शानदार असतो. ढोलताशा पथक, बँजो आदी वाद्यांनी या सोहळ्याची रंगत वाढत असते. यंदाचा गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. त्याची पूर्वतयारी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून मंगळवारी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ए टाईपचा राजा गणेशोत्सव मंडळाच्यावतीने श्रीगणेश पाटपूजन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला दखांनाधीश ढोल ताशा पथकाने रंगत आणली होती. तर विघ्नहर्ता बिट्स, मीत 8 या पथकांच्या वाद्यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थितांना ठेका धरायला लावला. यावेळी मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी गर्दी केली होती.
यावेळी समाजसेवक अजय वाळुंज व दर्शन भणगे यांच्या हस्ते गणपतीच्या रेखाचित्राचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला माजी नगरसेविका अंजली वाळुंज, माजी नगरसेवक राजू शिंदे तसेच सचिन नाईक यांच्यासह विभागातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावल्याचे मंडळाचे अध्यक्ष राजेश सपकाळ यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी हरिभाऊ महाडिक, स्वप्निल निंबाळकर, सागर राजपुरे, सागर निंबाळकर, संतोष राजपुरे, महादेव सणस, सोहम आहिरे, साहिल सणस, हर्ष निंबाळकर, माधव भोसले, बापू महाडिक, आकाश गोळे, संदीप मोरे, अतुल रांजणे, आदित्य पवार, साहिल पवार यांच्यासह मंडळांचे सोशल मीडिया हँडलर ओमकार आहिरे यांनी मेहनत घेतली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे