कोकण विभागात 54 ठिकाणी प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 17, 2023
- 525
19 ऑक्टोंबरला दूरदृश्य प्रणालीव्दारे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
नवी मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रासह कोकण विभागात 19 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 54 ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. ठाणे जिल्हयात 9 केंद्र, पालघर जिल्हयात 12, रायगड जिल्हयात 14, रत्नागिरी जिल्हयात 11 तर सिंधुदूर्ग जिल्हयात 8 ठिकाणी एकूण 54 ठिकाणी एकाच वेळी दूरदृश्य प्रणालीव्दारे कोकण विभागातील कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन होणार आहे.
ग्रामीण भागातील युवक युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार/स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, राज्यातील कामागरांचा आभाव दूर करण्यासाठी कोशल्य कामगारांचा पुरवठा करणे, अकुशल मनुष्य बळाला कौशल्यपूर्ण बनविणे गरज असल्यास पुन:कौशल्य देणे तसेच सध्याच्या कुशल मनुष्यबळाला करियर मध्ये वरच्या पातळीचे कौशल्य विकास प्रशिक्षण देणे यासाठी राज्यभरात 34 जिल्ह्यातील 350 तालुक्यांतील 511 गावांमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण विकास केंदे निर्माण करण्यात आली आहेत. प्रती केंद्र ग्रामीण भागातील 100 उमेदवारांच्या/प्रती वर्ष सुमारे 50 हजार उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करण्यात येणार आहे.
कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या उद्घाटन प्रसंगी स्वत: उपस्थित राहवे. या कार्यक्रमाची विशेष प्रसिध्दी करावी. या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक महाविद्यालयातीन विद्यार्थी, स्थानिक प्रसार माध्यमातील प्रतिनिधी, प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्रातील नोंदणी केलेले प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षण संस्थांमधील कर्मचारी यांना आमंत्रित करुन हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी नियोजन करावे अशा सुचना कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai