विकासकामांबाबत खा.राजन विचारेंनी केली आयुक्तांशी चर्चा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 21, 2023
- 351
नवी मुंबई : शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा समस्यांबाबत तसेच सुरु असलेल्या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. यावेळी विविध मुद्यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
नवी मुंबईतील शहरात वाढणाऱ्या दळणवळणामुळे नवी मुंबई शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने नवी मुंबई शहरात राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक असलेले उद्यान, मैदान, पार्किंग, रस्ते व इतर सुविधा यासाठी लागणारे सहाशे नवीन भूखंड सिडकोकडून मिळवण्यासाठी पालिकेने काय प्रयत्न केले अशी विचारणा विचारे यांनी केली. त्यावर सिडको व महापालिका महापालिका याबाबत फेर बैठका घेऊन नोव्हेंबरपर्यंत राज्य शासनाकडे पाठवून वर्षभरात निर्णय घेतील असे सांगण्यात आले. जुन्या टाकलेल्या ड्रेनेज वाहिन्या व जल वाहिन्या वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे बदलणे गरजेचे असल्याने महापालिकेने याकडे लक्ष देऊन याबाबत योग्य पावले वेळेत उचलावेत तसेच बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर निर्बंध घालावे अशा सूचनाही विचारे यांनी केल्या. घणसोली व कोपरखैरणे येथील कंडोनियमअंतर्गत उभ्या राहिलेल्या वसाहती चाळीस मूलभूत सुविधा पाणी व ड्रेनेज लाईनची कामे करण्यासाठी महापालिकेने धोरण अवलंबावे असे सांगितले. दिघा व तुर्भे परिसरात असणाऱ्या ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भुमिगत करण्यासाठी महापालिकेने अर्थसहाय्य करावे अशी मागणीही केली. पालिकेने दिव्यांगांना रोजगारासाठी स्टॉल परवाने दिले आहेत त्यामध्ये चर्मकार समाजाच्या ही लोकांना समावेश करून घेण्याची विनंती खासदार राजन विचारे यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसेच तसेच मोरबे धरणातून येणारी पाण्याची लाईन सानपाडा परिसरात घेण्यासाठी रेल्वे रूळ अडथळा ठरत असल्याने रेल्वेची परवानगी मिळवून घेऊ असे या बैठकीत ठरले.
ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील तुटलेल्या ड्रेनेज लाईन तसेच खाडीचे पाणी आत मध्ये येणारे वॉल याची दुरुस्तीसाठी अमृत योजनेअंतर्गत निधी उपलब्ध झालेला आहे डिसेंबर 2023 पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन विचारे यांना दिले आहे. या बैठकीच्या अंतिमेस नवी मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती बळकट असल्याने महापालिका कर्मचारी यांना बोनस वाढवून द्यावा तसेच त्यांना दिलेले मानधनही वाढवून द्यावे अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai