कंत्राटी भरतीचा जीआर रद्द
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 21, 2023
- 615
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई ः राज्यात कंत्राटी भरतीवरून महाविकासआघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टिकेची झोड उठवली. कर्मचाऱ्यांनी मंत्रालयासमोर निदर्शने केली. एकुणच कंत्राटी भरतीला होणारा वाढता विरोध पाहता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत राज्यातील कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी मविआ नेत्यांवर सडकून टीका केली.
पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस म्हणाले की, पहिली कंत्राटी भरती शरद पवार यांच्या एनसीपीने शिक्षण विभागात केली. 2010 साली अशोक चव्हाण यांनी पहिला जीआर काढला. यामध्ये वाहन चालक, तांत्रिक, लिपिक, शिपाई पदांचा जीआर काढण्यात आला. 1 सप्टेंबर 2021 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आरएफपीला सरकारची मान्यता मिळाली. मसूदा मंजुर झाला, निवदा निघाल्या. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सहीचा कागद दाखवत कंत्राटी भरतीला मान्यता मिळाल्याचा आरोप केला. हे संपूर्ण पाप काँग्रेसचं, उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आहे. आमच्याही काळात कंत्राटी लोकं घेतली आहे. पण आता विरोधक आंदोलन करत आहेत. त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे? असा सवाल करत कंत्राटी भर्ती रद्द केल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
मुंबईत सात दहा हजार पोलीस कमी पडू शकतात. पोलीस सुरक्षा महामंडळ ट्रेनिंग दिलेले कॅन्डीडेट 3 हजार मुंबईत वापरले जातील. त्याचा पगार मुंबई पोलिस यातून केला जाणार. एकुणच तरूणाईत असंतोष करून अराजक परिस्थितीत करण्याचे काम केले जात आहे. 9 एजन्सी माध्यमातुन जे काम केले जाणार त्याबाबत जीआर रद्द केला जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. इतर विभागात जनरल कंत्राट भरती सुरू राहील-ज्या एज्नसी माध्यातून भरती केली जाणार होती ती फक्त रद्द केली, फॅसिलीटी मॅनेजमेंटचा जीआर होत तो रद्द करण्यात आल्याचे ते म्हणाले. युवकांची दिशाभूल केल्याबद्दल काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने माफी मागितली पाहिजे. नाहीतर आम्ही त्यांना जनतेसमोर उघडे पाडू अशा इशारा फडणवीसांनी दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai