दररोज होणार तब्बल 975 विमानांचे उड्डाण
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 28, 2023
- 588
मुंबई : मुंबई विमानतळ प्राधिकरणाने 29 ऑक्टोबरपासून 30 मार्च 2024 पर्यंत हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हिवाळी वेळापत्रकात आठ टक्के उड्डाणांची संख्या वाढणार आहे.
हिवाळी वेळापत्रकानुसार मुंबई विमानतळावरून दररोज 975 विमानांचे उड्डाण होणार आहे. त्याशिवाय 115 ठिकाणी नवीन विमान सेवा सुरू केली गेली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत बाहेर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दिवाळी, नाताळ आणि नवीन वर्षाच्या हंगामात पर्यटकांची संख्या वाढते. विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या त्यात जास्त असते. त्यांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई विमानतळ प्रशासनाने यंदाच्या हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे. अलमाटी आणि बालीकडे नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांसह एअर कॅनडा आणि अझरबैजान एअरलाईन्सद्वारे नव्या सेवांचा विस्तार होणार आहे. मुंबईला जाणाऱ्या आणि तेथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता एन्टेबे, लागोस आणि इतर अनेक आफ्रिकन स्थळांना भेट देता येणार आहे. मध्य पूर्वेतील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी असलेल्या ‘एमिरेट्स एअरलाइन्स'ने 19 ऑक्टोबर 2023 पासून भारतात आपला प्रीमियम इकॉनॉमी केबिन क्लास सादर केला आहे. ज्याची सुरुवात मुंबई विमानतळापासून होत आहे. 30 ऑक्टोबरपासून एअरलाईन अधिकृतपणे केबिन क्लास सुरू करणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai