महेंद्र कोंडे यांच्या बावनकशी च्या व्दितीय आवृत्तीचे प्रकाशन
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 20, 2023
- 386
नवी मुंबई ः वितेचे नाते थेट ह्रदयाशी असल्याने नातेसंबंध तुटत चालले आहेत अशा आजच्या काळात माणुसपणाशी नाते जोडणारी महेंद्र कोंडे यांची कविता बावनकशी असल्याचे मत व्यक्त करीत सुप्रसिध्द कवी अशोक नायगावकर यांनी कवितेवर काळाची पुटे चढत नाहीत त्यामुळे भविष्यातील आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सच्या काळातही कविता तशीच राहील असा विश्वास व्यक्त केला.
ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयात संपन्न झालेल्या महेंद्र कोंडे लिखीत ‘बावनकशी' या सकाळ प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होत असलेल्या व्दितीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळयाप्रसंगी कविवर्य अशोक नायगावकर यांनी कोणत्याही प्रदूषणाचा परिणाम कवितेवर होत नसल्याने कवितेला चांगले दिवस येतील असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, उदयोजक व लेखक प्रफुल्ल वानखेडे, सकाळ प्रकाशनचे व्यवस्थापकीय प्रमुख आशुतोष रामगीर व कवी महेंद्र कोंडे उपस्थित होते.
नातेसंबंध हा प्रमुख आधार असणारी महेंद्र कोंडे यांची कविता जीवनातल्या विविध अनुभवांना स्पर्श करीत सामाजिक जाणीवांचे दर्शन घडविते. येशू सारख्या कवितेतून परात्म भावाला स्पर्श करते असे सांगत कवी अशोक नायगावकर यांनी ही कविता कोणताही आक्रस्ताळेपणा न करता नाजूकपणाने भेटते, त्यामुळे त्यांची वेदनाही हवीहवीशी वाटते असे सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ‘कशासाठी धावतोय, कुणासाठी धावतोय' याचा विवेक गमाविण्याच्या ‘आजच्या काळात जगणं वाहून जातंय आणि जगायचं राहून जातंय' अशा परिस्थितीत बावनकशी सारख्या कविता नवी ऊर्जा देतात असे मत व्यक्त केले. बावनकशी हे केवळ पुस्तकाचे नावच नाही तर महेंद्र कोंडे यांचे निस्पृह, पारदर्शी व्यक्तीमत्वही बावनकशी असल्याचे ते म्हणाले. महानगरपालिकेच्या अत्यंत धावपळीच्या कार्यपध्दतीत ाहूनही ऊर्जा व प्रतिभा टिकवून ठेवण्याची अवघड कला महेंद्र कोंडे यांना साध्य झालेली असून त्यांनी आपल्या प्रतिभेचे नवनवे अविष्कार यापुढील काळात घडवावेत अशा शुभेच्छा दिल्या. बावनकशी काव्यसंग्रह लवकरच ई-बुक, ऑडिओ बुक स्वरूपात यावा, जेणेकरुन पुस्तक हातात घेऊन न वाचणारी आधुनिक पिढी त्याचे इंटरनेटवरुन वाचन करु शकतील अशी सूचना प्रफुल्ल वानखेडे यांनी केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai