दिघा विभागात अतिक्रमण निर्मुलनाचा धडाका
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 04, 2024
- 461
नवी मुंबई ः दिघा विभागात पुन्हा एकदा अतिक्रमणाचे इमले उभे राहू लागले आहेत. खाजगी जमिनीवर झोपड्या बांधून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करुन सदर झोपड्या निष्कासित केल्या आहेत. यामुळे झोपडपट्टीदादा, भुमाफिया यांचे धाबे दणाणले आहेत.
दिघा विभागात खारकर वाडी, ईश्वरनगर दिघा येथे खाजगी जमिनीवर गेली अनेक दिवसांपासून पत्र्याच्या झोपड्या नव्याने तयार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची शहानिशा करुन एच विभाग दिघा कार्यालयामार्फत सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम 54 अंतर्गत ह्या बांधकामांना नोटीसा बजावल्या होत्या. मात्र तरीही नव्याने झोपड्या बांधणे सुरुच होते. त्यामुळे अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या निर्देशानुसार दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनी 16 झोपड्या निष्कासित केल्या.
ईश्वरनगर भागातील बांधकाम वस्तू विक्री व्यावसायिकांनी पदपथावर ठेवलेले बांधकाम साहित्य हटविण्याची धडक कारवाई देखील करण्यात आली. ह्या कारवाईत एक जेसीबी, पिकअप व्हॅन, 15 मजूर, अतिक्रमण विभागाचा पोलीस बंदोबस्त तसेच रबाले पोलीस ठाण्याचा फौजफाटा सहभागी होता. या कारवाईमुळे भूमाफियांचे धाबे दणाणल्याची चर्चा दिघा विभागात सुरु झाली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai