POEM प्रक्रियेद्वारे यशस्वी उपचार
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 09, 2024
- 284
कोकिलाबेन रुग्णालयात दोन रुग्णांना दिलासा
नवी मुंबई : गिळताना त्रास होण्याच्या समस्येवर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आधुनिक पेरोरल एंडोस्कोपिक मायोटॉमी प्रक्रियेचा उपयोग करून दोन रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केले गेले. मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोनामुळे या दोन्ही रुग्णांना बरे होण्यात मदत झाल्याने येथील डॉक्टरांच्या टिमसह रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.
41 वर्षांचे अशोक यांना गेल्या दहा वर्षांपासून जेवताना छातीमध्ये त्रास होत होता. दुसरी केस सिराज देवी या 70 वर्षांच्या महिलेला गेल्या पाच वर्षांपासून गिळताना त्रास होत होता. खूप जुना खोकला होता, सतत होणाऱ्या एस्पिरेशन न्यूमोनियामुळे फुफ्फुसांचे फायब्रोसिस झाले होते. अन्ननलिकेवर परिणाम करणारी एक स्थिती, ॲकलेसिया कार्डियाचे निदान करण्यात आल्यावर रुग्णांवर खूपच कमी इन्व्हेसिव्ह असलेली POEM प्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे लक्षणांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा दिसून आली. तिसऱ्या दिवशी त्यांना घरी पाठवण्यात आले. मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोनामुळे या दोन्ही रुग्णांना बरे होण्यात मदत मिळाल्याचे या दोन्ही केसेसमधून दिसून येते.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये कन्सल्टन्ट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ दीपक भंगाळे यांनी सांगितले, “ॲकलेसिया अशी स्थिती आहे, ज्यामध्ये आपण खाल्लेले अन्न पोटापर्यंत घेऊन जाणारी अन्नप्रणाली नीट आकुंचन पावत नाही, त्यामुळे अन्न पोटापर्यंत नेणे कठीण होऊन बसते. त्याशिवाय अन्नप्रणालीच्या खालच्या भागातील एक स्नायू एसोफेजियल स्फिन्क्टर नीट रिलॅक्स होऊ शकत नाही, त्यामुळे अन्न गिळणे कठीण होते. त्यामुळे खोकला येतो किंवा श्वास अडकतो. तसेच अन्न नलिकेमध्ये अडकू शकते. रुग्णालयाचे नवी मुंबईचे संचालक व प्रमुख डॉ बिपीन चेवले यांनी सांगितले, आम्ही नवी मुंबई आणि आजूबाजूच्या भागातील रुग्णांसाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये ही आधुनिक POEM प्रक्रिया सादर केली आहे. आमच्या रुग्णांची सर्वोत्तम देखभाल करण्यासाठी नवीन मेडिकल प्रगती आणि मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन वापरण्याप्रती आमची बांधिलकी यामधून दर्शवली जाते.
POEM एक मेडिकल प्रक्रिया आहे, जिचा उपयोग करून गिळण्यामध्ये होत असलेल्या त्रासावर उपचार केले जातात. POEM प्रक्रिया सर्वात पहिल्यांदा 2008 साली जपानमध्ये आणि त्यानंतर नोव्हेंबर 2013 मध्ये युकेमध्ये केली गेली. तेव्हापासून या आधुनिक प्रक्रियेचा उपयोग ॲकलेसियासारख्या एसोफेजियल मोटीलिटी समस्यांच्या उपचारांसाठी केला गेला आहे. शरीरावर कोणतेही बाह्य घाव न करता ही प्रक्रिया केली जाते आणि यासाठी साधारणपणे 60 ते 90 मिनिटे लागतात. यासाठी सामान्य अनेस्थेशिया दिला जातो. अमेरिकन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोइन्टेस्टायनल एंडोस्कोपीने याला सुरक्षित व प्रभावी उपचार पर्याय म्हणून मान्यता दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai