मिस नवी मुंबईसाठी चौदा सौंदर्यवती सज्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 02, 2024
- 360
तेराव्या पर्वाची अंतिम फेरी आंतराष्ट्रीय महिला दिनी
नवी मुंबइ ः प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धांपैकी एक असणारी मिस नवी मुंबई आपल्या तेराव्या पर्वात पदार्पण करीत आहे. यू अँड आय एंटरटेनमेंट आयोजक असलेल्या या स्पर्धेच्या तेराव्या पर्वासाठी चौदा सौंदर्यवती सज्ज झाल्या आहेत. 8 मार्च या आंतराष्ट्रीय महिला दिनी यांची अंतिम फेरी होणार आहे.
मिस नवी मुंबई 2024 ची माहिती देण्यसाठी फोर पॉइंट्स वाशी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी अंतिम फेरीत दाखल झालेल्या सौंदर्यवतींनी उपस्थितांची मने जिंकली. आंतरराष्ट्रीयस्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणे व जागतिक सौंदर्य स्पर्धा जिंकणे सोपे नाही. प्रथम फेरीत शेकडो सहभागी स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट सौंदर्यवतीं निवडणे खूप कठीण आहे. निवडलेल्या सौंदर्यवतींना यू अँड आय टिम च्या वतीने उत्तमरित्या प्रशिक्षित केले जात असल्याचे यू अँड आय एंटरटेनमेंटचे हरमीत सिंग यांनी सांगितले. तर तरुण मुलींमधील गुणविषेश ओळखून ते तेवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना रंगमंचावर आणण्यासाठी आम्ही वर्षानुवर्षे कठोर परिश्रम घेत आहोत. आणि या प्रतिभावान मुलींना योग्य असे व्यासपीठ देऊ शकलो याचा आम्हाला आनंद असल्याचे यू अँड आय एन्टरटेनमेंटचे डायरेक्टर मनमीत सिंग यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी फोर पॉईंट नवी मुंबईचे किरण मुनीराज,अभिजित अदूरकर, रिया मेक्कट्टुकुलम, मिस महाराष्ट्र गौरी गोठणकर ,डॉ संजीव कुमार,अशोक मेहरा,सौम्या सिंग व इतर मान्यवर उपस्थित होते. अंतिम फेरी मध्ये दाखल झालेल्या सौंदर्यवतींमध्ये श्रद्धा चौधरी, गीताश्री डेका, हर्षिखा रावत, भावना अजवानी, स्नेहा धाकटे, श्रिया नंदिनी,सपना देवडा, सुकन्या कंदारकर, कनक अग्निहोत्री, कुमुद कुमार, अनुष्का सिंह, मयुरी मिश्रा,हिमांशी छल्लानी, तमन्ना भरत यांचा समावेश आहे.
रॅम्प वॉकचे प्रशिक्षण अभिनेत्री आणि मॉडेल सिमृती बथिजा- रनवे कोरिओग्राफी आणि पेजेंट ग्रूमिंग एक्सपर्ट- मिस इंडिया इंटरनॅशनल 2019 द्वारे केले जाईल. तसेच व्यक्तिमत्व विकास, सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग आणि मेंटल वेलनेस मेंटॉरिंग हे मानसशास्त्रज्ञ आणि व्यक्तिमत्व विकास मेंटॉर-इंदरप्रीत कौर गुप्ता यांच्याद्वारे दिले जातील. जेणे करून त्यांच्यातील व्यक्तीमत्वाला चालना मिळेल व अंतिम फेरीत स्वतःला त्या सिद्ध करतील. या स्पर्धेची अंतिम फेरी आंतराष्ट्रीय महिला दिनी शुक्रवार 8 मार्च 2024 रोजी वाशीच्या फॉर फोईन्ट्स मध्ये संपन्न होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai