31 मार्चपूर्वी मालमत्ता कर भरा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 27, 2024
- 372
नवी मुंबई ः 29 फेब्रुवारी 2024 रोजीच जाहीर करण्यात आलेल्या मालमत्ताकर अभय योजना अंतर्गत 21 मार्चपासून 31 मार्च 2024 पर्यंत थकीत मालमत्ता करासह शास्तीची केवळ 50% रक्कम भरणा करावी लागणार आहे. म्हणजेच शास्तीच्या रक्कमेत 50 टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे मालमत्ताकर अभय योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी थकीत मालमत्ताकरावरील शास्तीच्या रक्कमेत भरीव सूट प्राप्त करुन घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी आपला विद्यमान मालमत्ताकर 31 मार्चपूर्वी विहित वेळेत भरुन शहर विकासास हातभार लावावा असेही आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना आपला मालमत्ताकर सुलभ रितीने भरणा करता यावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रे तसेच मालमत्ताकर भरणा केंद्रे 31 मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत कार्यरत राहणार असून नागरिक नवी मुंबई पालिकेच्या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या घरातूनच ऑनलाईन करभरणा करू शकतात.
तरी थकित मालमत्ताकर धारकांनी अभय योजने अंतर्गत शास्तीवर 50 टक्के सवलत मिळवावी व आपला थकित मालमत्ताकर भरणा करावा त्याचप्रमाणे विद्यमान वर्षाच्या मालमत्ताकराचा भरणाही 31 मार्चपूर्वी करावा आणि शहर विकासाला हातभार लावावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai