विशेष विद्यार्थ्यांनी केले मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 30, 2024
- 315
ईटीसी केंद्रातील विशेष विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅली
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्रानेही महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार या मतदार जनजागृती मोहीमेत सक्रिय सहभाग घेतला असून विशेष विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच दिव्यांग व्यक्ती आणि शिक्षक यांनी जनजागृतीपर रॅलीत सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.
अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड तसेच ईटीसी केंद्र संचालक तथा उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली ईटीसी केंद्र इमारतीपासून वाशी रेल्वे स्टेशन परिसरात मतदानाचे आवाहन करणारी रॅली काढण्यात आली. यामध्ये ईटीसी केंद्रातील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच विशेष विद्यार्थी व त्यांचे पालक आणि प्रौढ विशेष विद्यार्थी व व्यक्ती सहभागी झाले होते.
यावेळी ईटीसी केंद्रातील सहशालेय शिक्षकांनी तयार केलेले मतदान जनजागृतीचे फलक घेऊन मतदानाचा हक्क बजावण्याकरिता घोषणा देण्यात आल्या आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेत त्यांना 20 मे रोजीच्या लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. ईटीसी केंद्राचे शैक्षणिक व्यवस्थापक व अधिक्षक यांच्या नियंत्रणाखाली या रॅलीचे सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. विशेष विद्यार्थी व व्यक्तींनी आपल्या पालकांसह रॅलीव्दारे केलेल्या मतदानाविषयक जनजागृती उपक्रमाची नागरिकांकडून प्रशंसा करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai