Breaking News
उरण ः उरण शहरातील रेल्वे स्थानकासमोर 6 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता क्रेटा चारचाकी चालकाने भरधाव वेगात स्कुटरला धडक दिल्याने पती, पत्नीचा मृत्यू तर तीन वर्षांची चिमुरडी जबर जखमी होण्याची दुर्दैवी घटना घडली होती. या गंभीर अपघातात तीन वर्षाच्या जखमी चिमुरडीला सामाजिक कार्यकर्ते गौरव म्हात्रे यांनी त्वरित रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. त्यामुळे अपोलो हॉस्पिटल तर्फे वर्ल्ड एमेरजेन्सी डे (जागतिक आपत्कालीन दिवस) चे औचित्य साधून गौरव यांना वार्षिक अवॉर्ड ‘गोल्डन अवर हिरो' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
उरण नागाव म्हातवली येथील सामाजिक कार्यकर्ते गौरव म्हात्रे यांनी आजपर्यंत अनेक गोर गरिबांना मदतीचा हात दिला आहे. अनेकांच्या सुख दुःखात धावून गेले आहेत. गौरव म्हात्रे यांनी सुरज तांडेल ग्रुप तर्फे अनेक सामाजिक कार्ये सुद्धा केली आहेत. तसेच एका 3 वर्षाच्या गंभीर जखमी असलेल्या मुलीला त्वरित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याने तिचे प्राण वाचले. गौरव म्हात्रे यांनी दाखविलेल्या या माणुसकीच्या कार्याची दखल घेत अपोलो हॉस्पिटल तर्फे ‘गोल्डन अवर हिरो' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अपोलो हॉस्पिटलचे एमेरजेंसी डिपार्टमेंट हेड डॉ. नितीन जगासिया यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी हॉस्पिटल विविध विभागातील डॉक्टर, नर्स, अधिकारी कर्मचारी, तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai