नवरंग पक्ष्याला जीवनदान
- by Aajchi Navi Mumbai
- May 28, 2024
- 391
उरण ः केअर ऑफ नेचर संस्थेचे चिंचपाडा शाखाध्यक्ष रुपेश पाटील यांना करंजाडे येथे त्यांच्या राहत्या घराजवळ भारतीय नवरंग हा पक्षी अशक्त अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी या पक्षाला उपचारासाठी केअर ऑफ नेचर संस्थेचे राजू मुंबईकर यांच्याकडे सोपवले. वेळीच उपचार मिळाल्याने नवरंग पक्ष्याला जीवनदान मिळाले.
नवरंग हा दुर्मिळ पक्षी अशा कमकुवत अवस्थेत असल्याचे कळताच केअर ऑफ नेचरचे संस्थापक राजू मुंबईकर यांनी त्या पक्षावर उपचार करण्यासाठी त्याला वेश्वी येथे आपल्या घरी आणून वेळीच त्याचावर उपचार करण्यास सुरुवात केली. केअर ऑफ नेचर या संस्थेकडून गेली अनेक वर्षे, स्नेक रेस्क्यू, जखमी वन्यजीवांवर उपचार, वृक्षारोपण आणि अशा अनेकानेक प्रकारची निसर्ग संवर्धनाची कामे सातत्याने करण्यात येतात. दुर्मिळ आणि तितकाच आकर्षक असा हा ‘नवरंग' पक्षी, सुश्रुषा करून हा पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी वेश्वी येथील डोंगररानात त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. या पक्षाच्या शरीरावर असलेल्या विविध नऊ रंगामुळेच नवरंग हे नाव पडलेलं आहे. याला इंग्रजीमध्ये इंडियन पिट्टा म्हणतात. पक्षीप्रेमी व वन्यजीव छायाचित्रकारांना या पक्षाच्या असलेल्या विलक्षण सौंदर्याची भुरळ पडलेली असते. आता रायगड जिल्ह्यात वीण करण्यासाठी आलेल्या या नवरंग पक्षाला पाहण्यासाठी पक्षप्रेमी याचा रानवाटेत शोध घेताना दिसून येत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai