उरणची संस्कृती बनली इटलीतील स्टुडन्ट ॲम्बेसिटर
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 22, 2024
- 356
उरण ः नवघर गावाच्या धनश्री हरेश्वर भोईर यांची कन्या संस्कृती भोईर मास्टर ऑफ फार्मास्युटिकल बायोटेक्नोलॉजी या उच्च शिक्षणासाठी इटली येथील प्रथम क्रमांकावर असणाऱ्या युनिवर्सिटी ऑफ बोलोग्ना येथे शिक्षण घेत आहे. तेथए तिची स्टुडन्ट अम्बेसिटर म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे तिचे भारतासह इतर देशातून आलेल्या विद्यार्थीवर्गासह शिक्षकांनी कौतुक व अभिनंदन केले.
संस्कृती भोईरचे प्रथम प्राथमिक शिक्षण नवी मुंबई येथील जे.एन.पी.टी विद्यालय येथे घेऊन 12 वी पर्यंतचे शिक्षण यु.ई.एस उरण येथे घेऊन पुढील पदवी शिक्षण ए.आय.के.टी.सी युनिवर्सिटी ऑफ मुंबई येथे पुर्ण करून पुढील शिक्षण घेण्याची जिद्दीने आता ती मास्टर ऑफ फार्मास्युटिकल बायोटेक्नोलॉजी या उच्च शिक्षणासाठी इटली येथील प्रथम क्रमांकावर असणाऱ्या युनिवर्सिटी ऑफ बोलोग्ना येथे शिक्षण घेत आहे. आज कुमारी संस्कृती हरेश्वर भोईर हिने आपल्या भारत देशासह रायगड जिल्हासह उरण तालुक्यातील नवघर गावचे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवले आहे. युनिवर्सिटी ऑफ बोलोग्ना या तीच्या युनिवर्सिटीमध्ये झालेल्या स्टुडन्ट ॲम्बेसिटर निवडणुकीत संस्कृती भोईर हिची प्रथमच भारतीय ॲम्बेसिटर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भुतपुर्व स्टुडन्ट अम्बेसिटर तसेच या युनिवर्सिटीतील अनेक देशातून आलेल्या विद्यार्थीवर्गासह शिक्षकांनी संस्कृतीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. संस्कृतीने पदभार स्विकारला असून भारत देशाची या सुपुत्रीने रायगड जिल्हासह उरण तालुक्यातील नवघर गावाचे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवल्यामुळे हिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai