Breaking News
उरण ः भारतीय कामगार संघटनेच्या वाहतूक विभागातर्फे उरण तालुक्यातील वाहतूक संघटनेच्या उरण विधानसभा अध्यक्ष करण चंद्रहार पाटील यांनी नियुक्त्या जाहीर केल्या. त्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यामध्ये उरण विधानसभा उपाध्यक्षपदी सौरभ दत्ताराम पाटील, जासई विभाग अध्यक्षपदी अतुल नामदेव मढवी व नवघर विभाग अध्यक्षपदी संतोष नामदेव पाटील यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या, यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व वाहतूक संघटनेबरोबर शिवसेना पक्षाचा कार्य पण आपल्या हातून घडावं अशी अपेक्षा व्यक्त केली. योग्य अशा व्यक्तींची निवड झाल्याने जनतेतून आनंद व्यक्त होत आहे.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai