Breaking News
उरण ः मोठीजुई गावातील 400 हून अधीक वर्षांपेक्षा जुने असलेल पिंपळाचे झाड कोसळल्याची घटना सोमवारी (ता.01) रात्री घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र झाडाखाली उभ्या असलेल्या काही वाहनांचे आणि दुकानांचे नुकसान झाले. तसेच ह्याच जागेवर पुन्हा पिंपळाच झाड लावण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
मध्यरात्रीच्या वेळी ह्या घटना घडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. झाडाच्या आजूबाजूला काँक्रीटीकरणामुळे झाडाच्या मुळाची पकड सैल झाली होती आणि रात्री खूप जोराचा वारा होता त्यामुळे हे महाकाय जुनं झाड कोसळले. हे झाड गावची एक वेगळी ओळख असल्याने ही बातमी कानावर पडताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पडलेल्या झाडाची अवस्था बघून दुःख व्यक्त केले. मात्र कित्तेक वर्षे आम्हाला मोफत ऑक्सिजन देणारं आमचा आधार गेला आहे, तसेच आमचा प्राण गमावल्याची भावना मोठीजुई गावचे रहिवासी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे ह्याच जागेवर पुन्हा पिंपळाच झाड लावण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. हे झाड पडल्याने गावातील ये जा करणाऱ्या वाहनांची रहदारी ठप्प झाली. या सोबत मोठीजुई गावातील बहुतेक ठिकाणी लाईटचे खांब देखील पडले असल्याने गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे, लाईटचे खांब त्वरित लावून वीज पुरवठा पूर्ववत करण्याची जनतेतून मागणी होत आहे, त्यामुळे एमएसईबीने या ठिकाणी त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.
ज्या ज्या नागरिकांचे या घटनेमुळे आर्थिक नुकसान झाले आहे त्या नागरिकांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे. त्वरित पंचनामा करून या नुकसान ग्रस्त नागरिकांना शासनाने आर्थिक मदत करून न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai