उरणमध्ये काँग्रेसचा झंझावात
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 21, 2024
- 140
अनेक ठिकाणी नामफलकाचे अनावरण.
उरण ः भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत गाव तेथे काँग्रेस उभी करण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी, प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी अंगीकारला आहे. त्याची सुरुवात ही दिघोडे गावातून केली. गावा गावात काँग्रेसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बुधवारी ( दि18) या संकल्पेचा दुसरा टप्पा म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी भेंडखळ गावातील गाव तेथे काँग्रेस या नामफलक अनावरण सोहळ्याच्या माध्यमातून मोठ्या धुमधडाक्यात सुरू केला आहे.
काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्याचे काम केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्वसामान्य माणसाच्या हृदयात घर करून आहे, हे गाव तेथे काँग्रेस या नामफलक अनावरण प्रसंगी पाहायला मिळत आहे. प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांनी भूमीपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा उभारला. जनमानसांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे शेवटी स्पष्ट केले.
गाव तेथे काँग्रेस या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघातील भेंडखळ,नवघर, पागोटे, जसखार, सोनारी,करळ,फुंडे,पाणजे,डोंगरी,बोकडविरा,नवीन शेवा,द्रोणागिरी नोड सह इतर महालण विभागातील गावात काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तथा रायगड प्रभारी श्रीरंग बरगे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या नामफलकांचे अनावरण करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai