माझी वसुंधरा अभियान अंतर्गत उरण नगरपरिषद उत्तेजनार्थ
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 04, 2024
- 637
उरण ः महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत पर्यावराणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवला जातो. राज्य शासनाने 27 सप्टेंबर रोजी जाहिर केलेल्या निकालानुसार कोकण महसुली विभागातुन उरण नगरपरिषदेस उत्तेजनार्थ पारितोषीक मिळाले आहे. त्यानुसार रु.50 लक्ष एवढी रक्कम पारितोषीकाच्या स्वरुपात मिळणार आहे.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत निसर्गाच्या भूमी, जल, अग्नी, वायु व आकाश या पंचमहाभुतांवर लक्ष केंद्रीत करण्यात येते. या उपक्रमातुन वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करुन पर्यावरण सुधरणेकामी शाश्वत प्रयत्न करण्यात येतात. माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत 414 नागरी स्थानीक संस्था व सुमारे 22218 ग्रामपंचायतीनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये उरण नगरपरिषदेने सहभाग नोंदवला होता. याकामी दिनांक 2 मे ते 25 मे या कालावधीत त्रयस्थ यंत्रणेमार्फत उरण नगरपरिषद क्षेत्राचे मुल्यांकन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने, राज्य शासनाने 27 सप्टेंबर रोजी जाहिर केलेल्या निकालानुसार कोकण महसुली विभागातुन उरण नगरपरिषदेस उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले असुन रु.50 लक्ष असे पारितोषीकाचे स्वरुप आहे. उरण नगरपरिषदेस मिळालेल्या पारितोषिकामुळे नगरपरिषदेत आनंदाचे वातावरण आहे. तसेच, मुख्याधिकारी यांनी सदर उपक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केलेबद्दल स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी, नगरपरिषदेचे सर्व विभागप्रमुख, कर्मचारी, सफाई कामगार व शहरातील नागरिकांचे आभार मानले. तसेच यापुढेही माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मनोदय व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai