विमानोड्डाणांची यशस्वी भरारी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 11, 2024
- 379
नवी मुंबई विमानतळ धावपट्टीवर वायुदलाच्या दोन विमानांची उड्डाण
नवी मुंबई ः बहुचर्चित, महात्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरु करण्याच्या उद्देशाने तेथील कामे प्रगतीपथावर आहेत. अशातच वेगवेगळ्या विमान उड्डाणांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. शुक्रवारी वायुदलाच्या लढाऊ विमानांची उड्डाण चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडली. भारतीय हवाईदलाचे ‘सी 295' आणि सुखोई विमानाचे उड्डाण आणि लँडींग यावेळी करण्यात आले.
विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे. सिडको मंडळाला तीन महत्वाचे प्रकल्प आचारसंहितेपूर्वी मार्गी लावायचे होते. या तीन प्रकल्पांमध्ये 26 हजार महागृहनिर्माण प्रकल्पाची सोडत, खालापूर येथील इर्शाळवाडी येथे आदिवासी बांधवांना घरांचे वाटप आणि सर्वात महत्वाचा प्रकल्प म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांच्या चाचण्यांचा समावेश आहे. त्यातील विमातळाच्या धावपट्टीची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. हवाई दलाच्या सूखोई विमानाने धावपट्टीवरून उड्डाण घेतलं. काही वेळ आकाशात उड्डाण करून ते विमान धावपट्टीवर उतरलं.
‘सी 295' विमानाने सात ते आठ घिरट्या अवकाशात घातल्या. त्यानंतर पाण्याचे धावपट्टीवर उतरले. विमान धावपट्टीवर उतरताच त्याला ‘वॉटर सॅल्यूट' देण्यात आले. दोन बाजूंनी पाण्याचे फवारे सोडून त्यामधून विमान गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमान धावपट्टीवर उतरताच अभिनंदन केले. यावेळी हवाईदलाचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते. त्यांनंतर काही वेळातच लढाऊ सुखोई 30 विमानानेही यशस्वी टेक ऑफ करुन ते विमानसुद्धा धावपट्टीवर यशस्वीपणे उतण्याचा क्षण अनेकांनी आपल्या डोळ्यात साठवला. या धावपट्टीची चाचणी यशस्वी झाल्याचे वायुदलाने जाहीर केले असले तरीही या विमानतळावरून मार्च 2025 पर्यंत आंतरदेशीय विमाने उड्डाण करू शकणार असून आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणाकरिता मात्र जून 2025 पर्यंत वाट पहावी लागणार आहे.
अजून अनेक चाचण्या विमानतळावर यापूढे चालूच राहणार असून या चाचण्यांच्या अहवालानंतर प्रत्यक्षात विमानतळ वापरासंदर्भातील परवानग्यांसाठी हालचाली सूरु होणार आहेत. लहान विमानाने धावपट्टी क्रमांक 26/08 यावरील उपकरणीय यंत्रातून वैमानिकांना मिळणारी माहिती (इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम) ची चाचणी सूरु झाली आहे. जुलै महिन्यात अशाच चाचण्यांचे नियोजन केलं होतं. परंतु, मुसळधार पावसामुळे ही चाचणी पुढे ढकलण्यात आली होती.
- दरवर्षी नऊ कोटी प्रवासी प्रवास करतील : फडणवीस
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शिवडी न्हावाशेवा सी लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडी मार्गाने जोडला जात असून तो देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार असल्याचे मत यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं. या विमानतळावरून 9 कोटी प्रवासी दर वर्षी प्रवास करतील असा दावाही फडणवीसांनी केला होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शिवडी न्हावाशेवा सी लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडी मार्गाने जोडला जात असून तो देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार आहे.
- विमानाच्या चाचणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवण्यात आले. परंतु त्यांची वेळ मिळू शकली नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थिती ही चाचणी घेण्यात आली.
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन येत्या मार्च महिन्यात देशांतर्गत विमानांचे उड्डन सुरु होणार आहे. तसेच त्यानंतर तीन महिन्यांत म्हणजे जून महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डान होणार असल्याचे सिडकोचे चेअरमन संजय शिरसाट यांनी सांगितले.
- विमानतळावरील 4 टर्मिनलवर जवळपास 350 विमाने एकाच वेळी पार्क केली जाऊ शकतात. तसेच या विमानतळावर मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी असणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai