तुतारीमुळे बेलापुरमध्ये रंगत
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 25, 2024
- 637
संदीप नाईक, मंदा म्हात्रे व विजय नाहटा यांच्यात लढत
नवी मुंबई ः भाजप जिल्हाप्रमुख संदीप नाईक यांनी भाजपाने तिकीट न दिल्याने पुन्हा घरवापसी करत राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हातात घेतली आहे. एवढे दिवस ऐरोली आणि बेलापुर मतदारसंघात भाजप सहज विजय मिळवेल असे चित्र होते. परंतु, संदीप नाईकांनी बेलापुरमधून तुतारी फुंकल्याने लढाईत चांगलीच रंगत भरली आहे. त्यातच नाहटांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मतदार कोणाच्या पारड्यात ‘विजय' टाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यात निवडणुका जाहीर झाल्या तरी महाविकास आघाडी व महायुतीत अजुनही जागा वाटप झालेले नाही. जसजसा जागा वाटपाचा तिढा सूटत आहे तसतशी उमेदवारी जाहीर होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास चार दिवस शिल्लक राहील्याने ईच्छुकांची धाकधूक वाढली आहे. संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बेलापुर मतदार संघात भाजपा जिल्हाप्रमुखांनीच तुतारी हाती घेतल्याने इतके दिवस सहज वाटणारा विजय आता खडतर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संदीप नाईक यांनी बेलापुर मतदारसंघात भाजपला खिंडार पाडत सूमारे 20 हून अधिक नगरसेवक आपल्या सोबत नेल्याने राष्ट्रवादीला चांगलेच बळ मिळाले आहे. मागील निवडणुकीत गणेश नाईक यांच्या बंडानंतरही राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अशोक गावडे यांनी 47 हजार मते मिळवली होती. परंतु, आता राष्ट्रवादीसह शिवसेना दुंभगल्याने नवी मुंबईत भाजपला आव्हान नव्हते, पंरतु संदीप नाईक यांच्य घरवापसीने पुन्हा एकदा बेलापुर मतदारसंघात रंगत भरली आहे.
शिंदेसेनेचे नाहटा व चौगुले यांनी आमदार मंदा म्हात्रे यांना पुर्णतः सहकार्य करु असे जाहीर आश्वासन बुधवारी झालेल्या मेळाव्यात दिले. परंतु, गुरुवारी नाहटा यांनीच अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने संदीप नाईक व मंदा म्हात्रे यांच्यात थेट लढत न होता तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, नाहटा यांना अर्ज मागे घ्यायला लावू अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे नेते देत असले तरी नाहटा यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार गेल्या वर्षभरापासून केल्याने ते आपला निर्णय बदलतील याची सुतराम शक्यता नाही. त्यातच अशोक गावडेही स्वराज्य पक्षाकडून नशीब आजमावणार असल्याची चर्चा आहे. मनसेचे गजानन काळे यांनीही बेलापुरमधून प्रचाराचा नारळ फोडला असून यावेळी त्यांना किती मते मिळतात याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. बेलापुर मतदारसंघातील लढत सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाल्याने संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष नवी मुंबईकडे लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai