नवीन वर्षात जेएनपीए ते गेट वे धावणार ई स्पीड बोट
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 28, 2024
- 487
फेब्रुवारीपासून तासाभराचा असलेला हा प्रवास अवघ्या 25 मिनिटांत होणार
उरण : जेएनपीए बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडियादरम्यान सुरू असलेला जलप्रवास फेब्रुवारीपासून जलद होणार आहे. सध्याचा तासाभराचा असलेला हा प्रवास अवघ्या 25 मिनिटांत वातानुकूलित ई स्पीड बोटमधून करता येणार आहे. त्यामुळे उरणकरांना गारेगार प्रवास सुविधा उपलब्ध होणारआहे.
जेएनपीएने लाकडी प्रवासी बोटींना अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षांत बंदरातून मुंबईत प्रवाशांसाठी अद्ययावत दोन स्पीड बोटी धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना जेएनपीएतून मुंबई 35 ते 40 मिनिटांत गाठता येणार आहे. याचा फायदा या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच होणार आहे. जेएनपीएने या बोटींच्या 37 कोटी 89 लाख 94 हजार 190 खर्चाच्या निधीलाही 20 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या बैठकीत मंजुरी दिली आहे.
जेएनपीएने बॅटरीवरील दोन ई-स्पीड बोटी या मार्गावर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीने दोन स्पीड बोटी पुरवठा करण्याची हमी दिली आहे. त्यानुसार उन्हाळी हंगामात 20 ते 25 प्रवासी क्षमता व पावसाळी हंगामात 10 ते 12 प्रवासी क्षमता असलेल्या हरित सागर आणि हरित नौका या दोन वेगवान बोटी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सेवेत दाखल होणार आहेत. या जलद प्रवासासाठी जादाचे दर आकारले जाणार आहेत.
जेएनपीए बंदरातून मुंबईत येण्या जाण्यासाठी लाकडी बोटींची व्यवस्था आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत या सागरी मार्गावरून लाकडी बोटी 16 फेऱ्या करीत प्रवासी वाहतूक करीत होत्या. यासाठी जेएनपीए दरमहा 19 लाख 68 हजार रुपये खर्च करीत आहेत. मात्र सध्या या सेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. प्रदूषणविरहित, सुरक्षित आणि कमी वेळेत मुंबईत ये- जा करण्यासाठी स्पीड बोटींचा पर्याय स्वीकारण्याची संकल्पना वर्षभरापूवच जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी अमलात आणण्यासाठी सूचना केली होती. त्याची अंमलबजावणीची तयारी प्रशासनाने केली असल्याचे बाळासाहेब पवार, उपसंरक्षक कॅप्टन यांनी सांगितले. जेएनपीएसध्या उरणपर्यंत रेल्वे सुरू झाली आहे. त्याशिवाय वाहतुकीसाठी अटल सेतूही खुला झाला आहे. त्यामुळे या जेएनपीए-गेटवे (मुंबई) या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक रोडावली आहे. या स्पीड बोटींमुळे तासभर लागणारा प्रवास केवळ 40 मिनीटांवर येणार असल्याने नागरिकांच्या वेळेत, पैशात आणि इंधनातही बचत होणार आहे.
- प्रदूषणविरहित स्पीड बोटींचा पर्याय
जेएनपीए प्रशासनाने लाकडी प्रवासी बोटी बंद करण्याचा निर्णय घेऊन त्याजागी प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या स्पीडबोटींचा पर्याय स्वीकारला आहे. प्रदूषणविरहीत, सुरक्षित आणि कमी वेळेत मुंबईत ये-जा करण्यासाठी स्पीडबोटींचा पर्याय स्वीकारण्याची संकल्पना जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी अमलात आणण्यासाठी सूचना केली होती. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली असल्याची माहिती जेएनपीएचे उपसंरक्षक कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी दिली. जेएनपीएने 10 वर्षाच्या कालावधीसाठी दोन स्पीड बोटींच्या 37 कोटी 89 लाख 94 हजार 190 खर्चाच्या निधीलाही 20 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली असल्याची माहिती जेएनपीएचे विश्वस्त रवींद्र पाटील यांनी दिली. - 25 मिनिटांत प्रवास
1. या प्रदूषणविरहित स्पीडबोटीमुळे 25 मिनिटांत प्रवाशांना जेएनपीएहून मुंबईत पोहचता येणार आहे. याचा फायदा या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच होणार आहे.
2. या सागरी मार्गाने जेएनपीएचे कामगार, नातेवाईक, स्थानिक प्रकल्पग्रस्त, कस्टम, एअरफोर्स, सीआयएसएफ, पोर्ट युजर्स आदी कामगारांसाठी वापर करता येत आहे. सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत या मार्गावरून बोटी सुरू असतात.
3. जेएनपीएने या बोटींच्या 37 कोटी 89 लाख 94 हजार 190 खर्चाच्या निधीलाही मंजुरी दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai