उघड्यावरील शोरमा खाल्ल््याने विषबाधा
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 03, 2025
- 442
उरण ः दिघोडे बस स्थानकाजवळील उघड्यावर विकला जाणारा शोरमा हा खाद्यपदार्थ खाल्याने तब्बल 41 जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी (दि29) घडली. पोटात दुखणे व उलट्या होऊ लागल्याने रुग्णांनी तातडीने जवच्या शासकीय तसेच खाजगी रुग्णालय गाठून उपचार केले. सुदैवाने सर्वांची प्रकृत स्थिर असली तरी उघड्यावरील अवैधपणे खाद्यपदार्थ विक्रि करणाऱ्या व्यावसायिकांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उरण शहरात अनेक गावातील नाक्यांवर राजरोसपणे उघड्यावरील खाद्यपदार्थ परप्रांतीय नागरीक विक्री करत आहेत. त्यामुळे उघड्यावरील अन्न खाल्ल्याने अनेकांना उलट्या, पोटात दुखण्याची कारणे समोर येत आहेत. त्यातच शनिवारी दिघोडे बस स्थानकाजवळील रस्त्यावर विकला जाणारा शोरमा हा खाद्यपदार्थ अनेकजणांनी खाल्ल्याने 41 जणांना विषबाधा झाली. त्यांना पोटात दुखायला लागले तसेच उलट्या होऊ लागल्याने 5 जणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवसापर्यंत बाधितांची संख्या 41 वर गेली. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारख पसरताच नागरिकांमध्ये घबराटाचे वातावरण निर्माण झाले. तर शासकीय आरोग्य विभागाने तातडीने यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी तसेच शोरमा बाधित रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावागावात रुग्णांची तपासणी सुरू केल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
अन्न व औषध विभाग प्रशासन, पोलीस यंत्रणा यांनी उरण तालुक्याकडे दुर्लक्ष न करता नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या उरण शहर व तालुक्यातील गावा गावातील नाक्यांवर राजरोसपणे उघड्यावर विक्री करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना संबंधित प्रशासन परवानगी देताच कशी असा सवाल डॉक्टरांनी उपस्थित करुन लहान मुलांनी, नागरिकांनी उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत असे आवाहन केले आहे. या प्रकरणी चौकशीअंती अवैध खाद्यपदार्थाचा स्टॉल सील करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai